पशुवैद्यकीय शास्त्रात स्वप्नाली सुतार हिचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 05:45 PM2021-03-31T17:45:10+5:302021-03-31T17:46:53+5:30
Education Sector Sindhudurg- मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या स्वप्नाली सुतार या विद्यार्थीनीने सध्याच्या कोरोनाच्या संकटात अपार कष्ट सोसत अभ्यास केला आहे. तिने पशुवैद्यकीय विभागाच्या दुसऱ्या वर्षी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे . तिचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
कणकवली : मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या स्वप्नाली सुतार या विद्यार्थीनीने सध्याच्या कोरोनाच्या संकटात अपार कष्ट सोसत अभ्यास केला आहे. तिने पशुवैद्यकीय विभागाच्या दुसऱ्या वर्षी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे . तिचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
गतवर्षी कोरोनामुळे शाळा , कॉलेज बंद होती. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास सुरू झाला होता. परंतु , ज्याना कोणतेच नेटवर्क उपलब्ध नव्हते त्या विद्यार्थ्याचे खूप हाल झाले. नेटवर्क शोधत ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी डोंगर माथ्यावर जाऊन अभ्यास करीत होते.
मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दारिस्ते गावच्या स्वप्नाली सुतार या विद्यार्थीनीने असेच अपार कष्ट सोसत अभ्यास केला डोंगरावरील झोपडीत इंटरनेट मिळत असल्याने तिचा अभ्यास तिथून सुरू होता. तिच्या कष्टाला आता यश आले असून पशुवैद्यकीय विभागाच्या दुसऱ्या वर्षी स्वप्नालीने वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे .
गतवर्षी स्वप्नाली सुतार हिच्या डोंगर माथ्यावर भर पावसात झोपडीत सुरू असलेल्या अभ्यासाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. अन्य प्रसिद्धिमाध्यमानीही तिचे परिश्रम देशभर पसरविले होते. त्यामुळे शासनानेही त्याची दखल घेत गणेशोत्सवाच्या कालावधीत दारिस्ते गावातील स्वप्नालीच्या घरी बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध करून दिले होते.
आम्ही कणकवलीकर परिवार , आमदार नितेश राणे तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनीही तिला सहकार्य केले होते. काहीजणांचे सहकार्य तिने विनम्रतापूर्वक नाकारले होते. पण तिने आपल्या परिश्रमाच्या जोरावर पशुवैद्यकीय शास्त्रात चांगले यश मिळविले आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.