वेळागर समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचविण्यास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:28 AM2019-11-14T11:28:11+5:302019-11-14T11:29:14+5:30
शिरोडा वेळागर परिसरात समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचवण्यास यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जोडपे असलेले दोघेही पर्यटक अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. दरम्यान त्याठिकाणी अनेकांनी त्यांना बुडताना पाहिले परंतु समुद्र खवळलेला असल्याने कोणी त्यांना वाचण्यात जाण्यास तयार नव्हता.
वेंगुर्ला : शिरोडा वेळागर परिसरात समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचवण्यास यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जोडपे असलेले दोघेही पर्यटक अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. दरम्यान त्याठिकाणी अनेकांनी त्यांना बुडताना पाहिले परंतु समुद्र खवळलेला असल्याने कोणी त्यांना वाचण्यात जाण्यास तयार नव्हता.
शिरोडा वेळागर किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची वर्दळ आहे. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. दरम्यान दोन विदेशी पर्यटक बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास समुद्र खवळलेला असतानाही अंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.
किनाऱ्यावर यावेळी वर्दळ होती. पण त्यांना वाचविण्यासाठी कोणी धाडस करत नव्हते. मात्र त्या ठिकाणी असलेल्या सुरज अमरे या युवकाने आपल्या प्राणाची कोणतीही पर्वा न करता त्या दोघांना वाचविले. यावेळी आबा चिचकर व अन्य उपस्थितांनी त्यांना दोरी देत पाण्यातून बाहेर यायला मदत केली. त्या दोघांनी अमरे यांचे आभार मानले. सूरज याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.