बांदा सरपंचांचा अचानक राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:35 PM2019-08-23T12:35:55+5:302019-08-23T12:37:11+5:30
बांदा ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच मंदार दिनकर कल्याणकर यांनी बुधवारी आपल्या सरपंच पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण हा राजीनामा सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पंकज पेडणेकर यांच्याकडे लेखी स्वरुपात दिल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बांदा : बांदा ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच मंदार दिनकर कल्याणकर यांनी बुधवारी आपल्या सरपंच पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण हा राजीनामा सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पंकज पेडणेकर यांच्याकडे लेखी स्वरुपात दिल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मंदार दिनकर कल्याणकर यांनी दिलेल्या पत्रकात असे लिहिले आहे की, सरपंच म्हणून आजपर्यंतच्या काळात बांदा ग्रामपंचायतीचे हिताचे काम प्रामाणिक निस्वार्थीपणे करत आलो. ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्य, नागरिकांनी देखील भरपूर प्रेम व विश्वास दाखविला आहे.
वैयक्तिक अडचणीमुळे सरपंच या पदाला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने, जनतेचे कोणते नुकसान होऊ नये, यासाठी सरपंच पदाचा राजीनामा सावंतवाडी सभापतींकडे लेखी स्वरूपात अर्ज सुपूर्द केला. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे तो चर्चेचा विषय बनला होता.