सुधा मूर्तींनी बापार्डे गावचं केलं कौतुक, 'KBC'तून मिळालेली रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी दिली होती
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 9, 2022 01:15 PM2022-11-09T13:15:16+5:302022-11-09T13:54:38+5:30
बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत माहिती जाणून घेतली.
देवगड : प्रसिद्ध लेखिका पद्मश्री डॉक्टर सुधा मूर्ती यांनी 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये भाग घेतला होता आणि या शो मधून मिळालेली सर्व रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी या शिक्षण संस्थेत देणगी स्वरूपात दिली होती. आज, बुधवारी बापार्डे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कॉलेजचे उद्घाटन पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती यांच्या हस्ते होत आहे.
या उद्घाटनाच्या निमित्ताने डॉ. सुधा मूर्ती या बापार्डे गावात आल्या होत्या. यावेळी त्यांनी बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत थोडक्यात माहिती सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्याकडून जाणून घेतली.
डॉ. सुहास राणे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी शैक्षणिक तसेच गावच्या समाजकामातही घेतं असलेल्या पुढाकारामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावची एक वेगळी ओळख देश, राज्यपातळीवर निर्माण करण्याचे काम या गावाने केले आहे. बापार्डे ग्रामपंचायत सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्या कामाचेही विशेष कौतुक केले.
यावेळी सरपंच संजय लाड, उपसरपंच रमेश देवळेकर, माजी जि, प, उपाध्यक्ष विठ्ठलराव नाईकधुरे, माजी जि, प,सदस्या अनघा राणे, ग्रामसेवक शिवराज राठोड, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नाईकधुरे,चेअरमन अजित राणे, सदस्य विश्वास नाईकधुरे, प्रियंका राणे, अतुल राणे, संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, एम,बी, नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.