पिंगुळी-गुढीपूर येथील विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:48 AM2019-09-09T11:48:55+5:302019-09-09T11:52:06+5:30
पिंगुळी-गुढीपूर येथील रिया रोशन गंगावणे (२३) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. रियाच्या बेळगाव-कर्नाटक येथील माहेरच्या नातेवाईकांचे जाबजबाब घेण्याचे काम कुडाळ पोलीस ठाण्यात सुरू होते.
कुडाळ : पिंगुळी-गुढीपूर येथील रिया रोशन गंगावणे (२३) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. रियाच्या बेळगाव-कर्नाटक येथील माहेरच्या नातेवाईकांचे जाबजबाब घेण्याचे काम कुडाळ पोलीस ठाण्यात सुरू होते.
रिया हिने शुक्रवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलीस पाटील प्रशांत नामदेव धुरी यांनी कुडाळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता या घटनेची नोंद करण्यात आली. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
दरम्यान, मृत विवाहितेचे कर्नाटक येथील नातेवाईक कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, त्यांचे जाबजबाब घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील यांनी दिली.
या घटनेनंतर कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी शुक्रवारी, तर तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. रियाच्या आत्महत्येप्रकरणी अद्याप तरी कोणतेही संशयास्पद कारण पुढे आले नसून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.