मालवणच्या ओझर येथे तरुणाची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 23:23 IST2022-07-26T23:22:58+5:302022-07-26T23:23:41+5:30
मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील मुळ रहिवासी असलेले समीर भगवान मुंज (३७) यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत मंगळवारी सायंकाळी ओझर येथील त्याच्या बंगल्यातील खोलीत सापडला.

मालवणच्या ओझर येथे तरुणाची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू
मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील मुळ रहिवासी असलेले समीर भगवान मुंज (३७) यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत मंगळवारी सायंकाळी ओझर येथील त्याच्या बंगल्यातील खोलीत सापडला. घरात कोणीही नसल्याने घराच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींनी खिडकीतून खोलीत प्रवेश करत समीर याचा मृतदेह खाली उतरविला.
समीर याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. समीर याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. समीर मुंज याने कोळंब येथे किराणा मालाचे दुकाने घातले होते.
सर्जेकोट, कोळंब, रेवंडी, कांदळगाव, ओझर या परिसरातील ग्रामस्थ याठिकाणी खरेदीसाठी येत असत. मुंज याने अल्पावधीतच आपल्या व्यवसायात जम बसविला होता. मुंज यांचे तोंडवळी येथेही रास्तधान्य दुकान आणि किराणा मालाचे दुकान होते. यामुळे कुटुंबाचा व्यवसाय त्यांनी कोळंब येथे सुरू केला होता. तो मनमिळावू व हसतमुख स्वभावाचा असल्याने अनेकांना परोपकारी वृत्तीने सहकार्य करत असे.