गोव्यातील युवकांची सावंतवाडीत आत्महत्या

By admin | Published: December 12, 2014 11:04 PM2014-12-12T23:04:45+5:302014-12-12T23:32:16+5:30

कारण अस्पष्ट : दोघेही जवळचे मित्र

Suicides in Sawantwadi by the youth of Goa | गोव्यातील युवकांची सावंतवाडीत आत्महत्या

गोव्यातील युवकांची सावंतवाडीत आत्महत्या

Next

सावंतवाडी : गोव्यातील दोन युवक आज, शुक्रवारी येथील रामकृष्ण लॉजमध्ये मृतावस्थेत आढळून आले. दोघेही जवळचे मित्र असून गोव्यातील कळंगुट येथे विदेशी चलन देवाण-घेवाण व्यवसायात काम करत होते. यातील प्रदेश शंकर चोडणकर (वय ३३, रा. बेती, बार्देश, गोवा) याने गळफास लावून, तर नीलेश श्रीराम पार्सेकर (४१, रा. कामुर्ली, बार्देेश, गोवा) याने विष प्राशन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, हे दोन्ही युवक बेपत्ता असल्याची नोंद म्हापसा पोलिसांकडे झालेली आहे.
शहरातील रामकृष्ण लॉजमध्ये गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रदेश व नीलेश हे दोन युवक राहण्यासाठी आले होते. त्यानंतर ते दिवसभर रूममधून बाहेर पडले नाहीत. शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामकृष्ण लॉजचे मालक मसूरकर हेत्यांना उठविण्यासाठी रूमच्या दरवाजावर गेले. त्यावेळी आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजाच्या छिद्रातून आतमध्ये बघितले. त्यांना प्रदेश चोडणकर हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला.
त्यामुळे मसूरकर हे घाबरले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक रणजित देसाई व महेंद्र शेलार यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता नीलेश पार्सेकर हाही मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या माहिती पत्रकावरून त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तसेच म्हापसा पोलिसांनाही माहिती दिली. त्यावेळी हे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने केली असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दोन्ही मृतदेहाचे पंचनामे करून मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी कुटिर रुग्णालयात पाठवले. या घटनेची माहिती मिळताच दोघा युवकांचे कुटुंब तसेच मित्रमंडळी सावंतवाडीत दाखल झाली. दोघा युवकांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल सुभाष तेली करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suicides in Sawantwadi by the youth of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.