देवगडची सुलभा कुलकर्णी प्रथम

By admin | Published: August 19, 2015 09:45 PM2015-08-19T21:45:50+5:302015-08-19T21:45:50+5:30

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा : मालवणातील महाविद्यालयात आयोजन

Sulabh Kulkarni first of Devgad | देवगडची सुलभा कुलकर्णी प्रथम

देवगडची सुलभा कुलकर्णी प्रथम

Next

मालवण : मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या सुलभा साईप्रसाद कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत गोगटे-वाळके महाविद्यालय रत्नागिरीच्या मैत्रयी श्रीकांत बांदेकर हिने द्वितीय, तर बी. एस. बांदेकर महाविद्यालयाच्या गीतांजली गुरुनाथ पेडणेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या मंजुळा रघुनाथ टिकम हिला उत्तेजनार्थ म्हणून निवडण्यात आहे. या स्पर्धेसाठी : कोकण २०२०, स. का. पाटील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, शिक्षण पद्धती : आज आणि उद्या, डिजिटल इंडिया हे चार विषय ठेवण्यात आले होते. विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दऊन गौरविण्यात आले.
सुवर्णमहोत्सवी वर्ष व स. का. पाटील यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभागाच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, संस्था कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, देवगड महाविद्यालयाच्या तरुजा भोसले, साहित्यिक रवींद्र वराडकर, सावंतवाडी महाविद्यालयाच्या सुमेधा नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत परीक्षक म्हणून तरुजा भोसले, रवींद्र वराडकर, सुमेधा नाईक यांनी काम पाहिले. यावेळी स्पर्धा समन्वयक डॉ. उज्ज्वला सामंत, कैलास राबते, आर. एन. काटकर, सुमेधा नाईक, बी. एच. चौगुले, एच. एम. चौगले, डी. व्ही. हारगिले, डॉ. एम. आर. खोत, आदी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Sulabh Kulkarni first of Devgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.