उन्हाचा पारा वाढला, गर्मीमुळे नागरिक हैराण, ४० अंशांचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 05:32 PM2021-04-01T17:32:31+5:302021-04-01T17:34:00+5:30
Temperature Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक कोरोनाच्या आजाराने त्रस्त झाले असतानाच उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक कोरोनाच्या आजाराने त्रस्त झाले असतानाच उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत.
गेले काही दिवस तापमानात सतत वाढत होत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रासले आहेत. गेले आठ दिवस तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उष्णता वाढल्याने त्याचा परिणाम आंबा, काजू या हंगामी फळांवर होताना दिसत आहे. आंबा अधिक उष्णतेमुळे डागाळण्याचे प्रमाण वाढले आहे.
काजू बिया करपून काळ्या पडताना आढळत आहेत. त्यातच कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. जिल्हा पातळीवर विविध माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची अंमलबजावणी तत्वत: केली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणारी गर्दीदेखील आता कमी झाली आहे. वाढणाऱ्या उष्णतेमुळे आजारही वाढणार आहेत.