कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:58 AM2019-04-22T10:58:16+5:302019-04-22T10:59:32+5:30
उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर १९ एप्रिल ते ११ मे या कालावधीत आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई - सीएटी मार्गावर या दोन गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कणकवली : उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर १९ एप्रिल ते ११ मे या कालावधीत आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई - सीएटी मार्गावर या दोन गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांपैकी मुंबई सीएसटी-करमाळी (०१००३/०१००४) ही गाडी १९ एप्रिल ते १० मे या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. सीएसटीहून ही गाडी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. आणि गोव्यात करमाळी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ एप्रिल ते १२ मे २०१९ या कालावधीत दर रविवारी करमाळी-मुंबई मार्गावर धावेल.
करमाळीहून ही गाडी दुपारी १२.५० वाजता सुटेल . दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता मुंबईत सीएसटी स्थानकावर पोहोचेल. दुसरी विशेष गाडी (०१००६/०१००५) ही देखील करमाळी ते सीएसटी मार्गावर धावणार आहे. २० एप्रिल ते ११ मे २०१९ या कालावधीत ही गाडी दर शनिवारी करमाळीहून दुपारी १२.५० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११ वाजता ५५ मिनिटांनी मुंबईत सीएसटीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ एप्रिल ते १२ मे २०१९ या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. ही गाडी सीएसटीहून रात्री १२.४५ वाजता सुटून त्याच दिवशी ती दुपारी १२.२० वाजता करमाळीला पोहोचेल.
या दोन्ही अतिरिक्त गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकांवर थांबणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या दोन गाड्यांच्या १६ फेऱ्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर जून महिन्यापर्यंत धावणाºया स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या आता तब्बल १८० वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.