सिंधुदुर्ग : पोलीस अधीक्षकांची भेट, कणकवली नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर बंदोबस्ताच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:19 PM2018-04-05T18:19:23+5:302018-04-05T18:19:23+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी कणकवली पोलीस स्थानकाला भेट देऊन पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना बंदोबस्ताबाबत सूचना केल्या. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट देण्यात आली.
कणकवली : जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी कणकवली पोलीस स्थानकाला भेट देऊन पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना बंदोबस्ताबाबत सूचना केल्या. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट देण्यात आली.
निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ६ अधिकारी व २५ पोलीस जादा मागविण्यात आले आहेत. २ दंगा काबू पथके दाखल झाली आहेत. शहरात ६ ठिकाणी जादा पोलीस बंंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरात विद्यामंदिर पटांगण येथे स्वाभिमान पक्षाची तर बस स्थानकानजीक शिवसेना-भाजपची सभा होत असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
स्वाभिमान व भाजप यांच्यात चुरशीची लढत होत असल्यामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दीक्षितकुमार गेडाम यांनी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या. तसेच पोलीस स्थानकानजीक बांधलेल्या पेट्राल पंपाचीही यावेळी पाहणी केली.