राजकारण वगळल्यास पाठिंबा

By admin | Published: October 15, 2016 01:13 AM2016-10-15T01:13:02+5:302016-10-15T01:13:02+5:30

राणे यांची केसरकरांना ग्वाही : जिल्हा नियोजन समिती सभा खेळीमेळीत

Support for excluding politics | राजकारण वगळल्यास पाठिंबा

राजकारण वगळल्यास पाठिंबा

Next

सिंधुदुर्गनगरी : राजकारण हे निवडणुकीपुरते असते. जिल्ह्याच्या विकासात राजकारण बाजूला ठेवून निपक्षपातीपणे काम करा, आपण कायमच सहकार्य करू, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिली.
नारायण राणे यांनी सुचविलेल्या सूचना आणि सर्व प्रकल्पांबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना दिले. एकंदरीत जिल्हा नियोजनची शुक्रवारची सभा राणे आणि केसरकर यांच्यात झालेल्या सुसंवादाने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार नारायण राणे यांनी घेतलेल्या मार्गदर्शकाच्या भूमिकेमुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या सभेत काही मुद्दे वगळता शांततेत झाली. यावेळी नारायण राणे यांनी सभागृहात मांडलेल्या सूचना आणि विकासाच्या सर्व प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याचे सुतोवाच केसरकरांनी दिले.
पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार राणे यांच्यात पूर्वीपासून असलेले राजकीय वैर पाहता शनिवारच्या नियोजन समितीच्या बैठकीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. जिल्हा नियोजन समितीच्या या पूर्वीच्या सभा वादळी झाल्या होत्या. मात्र राणे यांनी सभागृहात प्रवेश करताच त्यांची प्रशासनावर असणारी पकड व कसब तसेच प्रश्नांवर मुद्देसुद उत्तरे अशा विषयावर जिल्हा नियोजन समिती सभेत त्यांची वेगळीच छाप दिसून आली. राणे पालकमंत्री असताना धाक आजही आमदार असताना कायम राहिला आहे.
जिल्'ातील समाजकल्याणच्या सर्वच वसतीगृहाची झालेली दयनीय स्थिती, गोरगरीब रुग्णांची जिल्हा रुग्णालयातील बंद असलेल्या सुविधांमुळे होत असलेली परवड आणि वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान या विषयावर या सभेत चर्चा करण्यात आली. ८ महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत जे मुद्दे विचारले गेले होते. त्यावर अद्याप पूर्तता न झाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्'ात अनेक ठिकाणी गवे तसेच अन्य वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच काही शेतकऱ्यांना गव्यांनी दुखापती केल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या बचावासाठी काही ठिकाणी सौर कुंपन केली आहेत. मात्र ती पूर्णपणे नादूरूस्त आहेत. असे सांगत मुख्य वन संरक्षक रमेश कुमार यांना खासदार विनायक राऊत, संदेश सावंत, मधुसुदन बांदिवडेकर यांनी धारेवर धरले. गव्यांनीे दिगवळे येथील ज्या शेतकऱ्याला ठोकरुन जखमी केले आहे. त्याला उपचारासाठी लागलेल्या १ लाख ६७ हजार रुपयांच्या रकमेपैकी शिल्लक रक्कम तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून द्यावेत अशाही केसरकर यांनी सूचन् दिल्या.
अन् ठिणगी पडली....
समाजकल्याण विभागांतर्गत असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचे सांगत हा विषय सात वर्षांपासून सुरु असून यासाठी पालकमंत्री केसरकर यांना टार्गेट करु नये असे अतुल काळसेकर यांनी सांगताच सभागृहात शांततेत सुरु असलेली सभा अचानक वादळी झाली. या विषयामुळेच वादाची ठिणगी पडली. कॉँग्रेस आमदारांसह सर्वच सदस्यांनी आक्रमक होत काळसेकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने या वादावर अखेर पडदा पडला.

Web Title: Support for excluding politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.