सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ,  विजयाला भक्कम हात

By अनंत खं.जाधव | Published: June 5, 2024 05:33 PM2024-06-05T17:33:07+5:302024-06-05T17:33:30+5:30

अनंत जाधव सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने नारायण राणे यांना साथ दिल्याने राणेंच्या विजयाला ...

Support for Narayan Rane from Sawantwadi Assembly Constituency | सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ,  विजयाला भक्कम हात

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ,  विजयाला भक्कम हात

अनंत जाधव

सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने नारायण राणे यांना साथ दिल्याने राणेंच्या विजयाला भक्कम हातभार लागला आहे. मात्र, या मताधिक्याला आगामी विधानसभा निवडणुकीची किनार असून, विधानसभेला इच्छुक असणाऱ्यांनीच जोरदार प्रचार केल्यानेच हे मताधिक्य मिळाले असल्याचे दिसून आले.

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र, मध्यंतरी राज्यात झालेले राजकीय बदल यामध्ये सावंतवाडी मतदारसंघ सत्तांतराच्या बाजूने राहिला. विशेष म्हणजे  या सत्तांतरात दीपक केसरकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली, त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली होती. केसरकर यांनी राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग केले होते. तसेच त्यांच्या प्रचारातही आघाडी घेतल्याने राणेंचा विजय सहज शक्य झाला.

विजयाची कारणे

  • मतभेद विसरून प्रचार
  • या मतदारसंघात महाविकास आघाडीजवळ आश्वासक चेहरा नाही.
  • मतभेद विसरून शिंदेसेना व भाजप यांनी एकत्र प्रचार केला.
  • महायुतीकडून झालेल्या एकत्र प्रचार सभा आणि मतदारसंघातील विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात नेते व कार्यकर्ते यशस्वी झाले.


पराभवाची कारणे

  • प्रचारात सुसूत्रता नव्हती
  • सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीकडे नेता नाही.
  • प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असताना प्रचारात म्हणावी तशी सुसूत्रता नव्हती.
  • उमेदवार प्रचारात सक्रिय होते, पण पदाधिकाऱ्यांत तेवढा उत्साह दिसून आला नाही. 

Web Title: Support for Narayan Rane from Sawantwadi Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.