उमेद अभियान संघर्षाला ग्रामसंघाच्या महिलांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:45 PM2020-09-26T17:45:41+5:302020-09-26T17:49:21+5:30

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

Support of Gram Sangh women for Umed Abhiyan Sangharsh | उमेद अभियान संघर्षाला ग्रामसंघाच्या महिलांचा पाठिंबा

नाटळ येथे महिलांनी जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढली.

googlenewsNext
ठळक मुद्दे महिलांनी काढली प्रभातफेरी अभियान वाचविण्यासाठी शासनाला मदत

कणकवली : राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

कणकवली तालुक्यातल्या नाटळ हिरकणी प्रभागसंघातील नरडवे, नाटळ, कुंभवडे, दारिस्ते, दिगवळे येथील ग्रामसंघातील पदाधिकारी, सीआरपी ताई, कृषीसखी व महिलांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.

तसेच गावात विविध ठिकाणी स्वच्छता करून शासनाला हे अभियान चालविण्यासाठी प्रत्येकी १ रुपया मदतही गोळा केली. नाटळ हिरकणी प्रभागसंघातील विश्व ग्रामसंघ कुंभवडेच्या महिलांनी गावात प्रभात फेरी काढली व स्वच्छता केली. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष अनिता सावंत, सचिव प्राजक्ता सुतार, कोषाध्यक्ष सुलोचना सावंत, सीआरपी ताई सारीका सावंत यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सावली ग्रामसंघ नाटळच्या महिलांनी आपल्या गावात प्रभात फेरी काढली. यावेळी प्रभागसंघ अध्यक्ष रविना सुतार, सचिव शांती फर्नांडिस, सीआरपी ताई योगिता चव्हाण, सीआरपी ताई तन्वी राणे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. तर जिद्द ग्रामसंघ नरडवेच्या महिलांनीही उत्स्फुर्तपणे गावात प्रभातफेरी काढली.

यामध्ये सीआरपी ताई पूजा सावंत, कृषी सखी गीतांजली कांदे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. आधार ग्रामसंघ दारीस्ते संघाने आपल्या गावात प्रभातफेरी काढली सीआरपी ताई जान्हवी पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्ष नमिता सुतार, सचिव श्वेता शिरसाठ, कोषाध्यक्ष रश्मी साळसकर आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यावेळी आपले मत मांडताना या महिला म्हणाल्या, उमेद अभियानातील या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. तेव्हा आता त्यांना शासन जर कमी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या लोकांनी आम्हाला संघटित करून नवा विचार दिला आहे. त्यामुळे शासनाला जर या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर आम्ही देतो. मात्र या अधिकाºयांना काढून हे अभियान बंद करू नये.

नोकरीवर कायम ठेवा व अभियान वाचवा संदेश

यावेळी सर्व ग्रामसंघाच्या महिलांनी प्रत्येकी एक रुपया गोळा केला. ही रक्कम शासनाला पाठविली जाणार असून, तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही देतो. मात्र , हे अधिकारी आणि कर्मचारी कमी करू नका, आम्हाला आत्मनिर्भर करणाऱ्या या लोकांना नोकरीवर कायम ठेवा आणि अभियान वाचवा, असा संदेश दिला जाणार आहे.
 

 

Web Title: Support of Gram Sangh women for Umed Abhiyan Sangharsh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.