कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण

By सुधीर राणे | Published: June 5, 2024 06:03 PM2024-06-05T18:03:24+5:302024-06-05T18:03:55+5:30

सुधीर राणे कणकवली :  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विनायक राऊत यांच्यापेक्षा ४१,९९५ चे मताधिक्य ...

Support of Narayan Rane from the voters of Kankavali Assembly Constituency | कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण

कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण

सुधीर राणे

कणकवली :  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विनायक राऊत यांच्यापेक्षा ४१,९९५ चे मताधिक्य देत राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पाठराखण केली आहे.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात त्यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांना इतर मतदारसंघांच्या तुलनेत विनायक राऊत यांच्यापेक्षा सर्वाधिक मते मिळाली होती. गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास पाहता कणकवली हा भाग नारायण राणे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांची पाठराखण मतदारांनी करत १०,७३१ जादा मते दिली.

विजयाची कारणे

  • मजबूत पक्ष संघटना
  • कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपची मजबूत पक्षसंघटना बांधणी फलदायी ठरली.
  • भाजप देशाच्या सत्तेत पुन्हा आल्याने विकास शक्य असल्याचा मतदारांनी विश्वास दाखवत खासदार म्हणून नारायण राणेंची पाठराखण केली.
  • निवडणुकीचा प्रचार करताना महायुतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेले सांघिक काम जादा मतांमध्ये परावर्तित झाले.
  •  विधानसभेची रंगीत तालीम म्हणून आमदार नितेश राणे यांनी केलेले काम.


पराभवाची कारणे

  • चिन्ह पोहोचविण्यात कमी
  • फुटीमुळे उद्धवसेना पक्षसंघटना काहीशी कमकुवत झाली तर बदललेले मशाल चिन्ह ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचविण्यात कार्यकर्ते कमी पडले.
  • विनायक राऊत निवडून आले तरी त्यांचा पक्ष सत्तेत जाण्याची शक्यता कमी असल्याने मतदारांची त्यांच्याकडे पाठ.
  • या निवडणुकीत भाजपसोबत नसल्याने राऊत यांना काही मतांचा फटका बसला.
  • नारायण राणेंसारखा तगडा उमेदवार विरोधात असल्याने मतांवर परिणाम.

Web Title: Support of Narayan Rane from the voters of Kankavali Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.