Sindhudurg: मित्राला मेसेज केला, अन् पोलिस शिपाई सुरज पवार यांनी संपवले जीवन; नेमके कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:46 IST2025-04-08T13:45:41+5:302025-04-08T13:46:06+5:30
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग ) : कुडाळ पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सूरज अनंत पवार (३१ वर्षे, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ...

Sindhudurg: मित्राला मेसेज केला, अन् पोलिस शिपाई सुरज पवार यांनी संपवले जीवन; नेमके कारण अस्पष्ट
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : कुडाळ पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सूरज अनंत पवार (३१ वर्षे, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स, केळबाईवाडी, कुडाळ) यांनी सोमवारी दुपारी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह ते राहत असलेल्या रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समधील सदनिकेमध्ये आढळून आला. आत्महत्येपूर्वी त्यांनी मित्राला मोबाइलवर मेसेज केला होता. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
सूरज पवार हे कुडाळ पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. ते कुडाळमधील रामेश्वर प्रसाद सदनिकेमध्ये एकटेच राहत होते. सोमवारी दुपारी त्यांनी मित्राच्या मोबाइलवर ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’ अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्याचा मळगाव येथील भावाला दिली.
ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या सदनिकेतील खोलीत गेले असता, बाहेरून कुलूप लावलेले होते, परंतु किल्ली बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, सूरज पवार पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.