जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेला सुरूंग ; सिंधुदुर्ग राज्यात चौथ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:32 AM2019-01-19T11:32:24+5:302019-01-19T11:34:08+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरली असल्याचे आजच्या शिक्षण समिती सभेत उघड झाले. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम असणारा सिंधुदुर्ग यावर्षी मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. केंद्र शासनाच्या असर नामक एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेत हा निकाल समोर आला आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी याची गंभीर दखल घेऊन शिक्षकांची मानसिकता सकारात्मक करण्यासाठी येत्या काळात शिक्षण परिषद घेणार असल्याचे सांगितले.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरली असल्याचे आजच्या शिक्षण समिती सभेत उघड झाले. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम असणारा सिंधुदुर्ग यावर्षी मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. केंद्र शासनाच्या असर नामक एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेत हा निकाल समोर आला आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी याची गंभीर दखल घेऊन शिक्षकांची मानसिकता सकारात्मक करण्यासाठी येत्या काळात शिक्षण परिषद घेणार असल्याचे सांगितले.
शिक्षण विभागाची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ नाथ पै सभागृहात पार पडली.यावेळी समिती सचिव तथा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,सदस्य सरोज परब, संपदा देसाई,विष्णूदास कुबल, सुनील म्हापणकर, राजेंद्र म्हापसेकर, उन्नती धुरी , यांसह गटशिक्षणाधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम क्रमांकावर असणारा आपला जिल्हा यावर्षी चौथ्या क्रमांकावर गेल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सभागृहात सांगितले. ते पुढे म्हणाले केंद्राच्या असर संस्थेने 2018 मध्ये गुणवत्ता विषयक सर्वे केला होता. यात गणित व वाचन या प्रमुख दोन विषयांचे मुल्यमापन करण्यात आले होते.
इयत्ता तिसरी ते पाचवी मधील विद्यार्थी वाचन मध्ये राज्यात सहाव्या क्रमांकावर आहेत. तर गणितात राज्यात चौथ्या क्रमांकावर आहेत. सहावी ते आठवी मधील विद्यार्थी वाचनामध्ये तिस?्या तर गणितात पहिल्या क्रमांकावर आहेत. असे आंबोकर यांनी सांगितले. तर याबाबत विचार मंथन व शिक्षकांमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षांत शिक्षण परिषद आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले.
पुढच्या वर्षी जिल्हा राज्यात अव्वल असणार
सिंधुदुर्ग जिल्हा गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अव्वल होता. मात्र यावर्षी तो चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. ही सर्व वस्तुस्थिती विचारात घेऊन पुढच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल स्थानावर असेल असा विश्वास शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केला. यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.