सुशांत खिल्लारे हत्या प्रकरण: मृत्यूपूर्वी आईशी फोनवर संपर्क, धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 11:37 AM2023-02-03T11:37:10+5:302023-02-03T11:37:35+5:30

जातिवाचक शिवीगाळ करून हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल

Sushant Khillare murder case: Karad was brought from Pandharpur 20 days ago, contacted mother on phone before death | सुशांत खिल्लारे हत्या प्रकरण: मृत्यूपूर्वी आईशी फोनवर संपर्क, धक्कादायक माहिती आली समोर

सुशांत खिल्लारे हत्या प्रकरण: मृत्यूपूर्वी आईशी फोनवर संपर्क, धक्कादायक माहिती आली समोर

Next

सावंतवाडी : सुशांत खिल्लारे याचे वीस दिवसांपूर्वी पंढरपूर येथून अपहरण करून भाऊसो माने याने त्याला आपल्या कऱ्हाड येथील घरातच कोंडून ठेवले होते. तसेच अधूनमधून शेतात नेऊन खिल्लारेच्या तोंडाला रुमाल बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली असून खिल्लारे याने २९ जानेवारीला रात्री आपल्या आईशी शेवटचा संपर्क साधला होता. त्यात त्याने पैसे दिले नाही तर आपला हे जीव घेतील, असे सांगितले होते.

गुरुवारी सकाळी खिल्लारे मृत्यूप्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तुषार पवार यांच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ करून हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करून पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

पंढरपूर येथील सुशांत खिल्लारे याची हत्या कऱ्हाड येथेच करण्यात आल्याचे पुढे आल्यानंतर सावंतवाडीत आलेल्या खिल्लारे याच्या नातेवाइकांनी आपला जबाब पोलिसांकडे दिला. त्यामुळे सुशांतचा खून २९ ला झाला. यावर पोलिसांकडूनच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

दरम्यान, खिल्लारे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांकडून दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात जातिवाचक शिवीगाळ करून हत्या केल्याचा गुन्हा तुषार पवार यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच हा तपास पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

तपास सावंतवाडी पोलिसच करणार

सुशांत खिल्लारे हत्या प्रकरणाचा तपास सावंतवाडी पोलिसच करणार असल्याचे स्पष्ट झाले असून, हा तपास कऱ्हाड पोलिसांकडे वर्ग केला जाईल, असे सांगण्यात येत होते; पण आता हा तपास सावंतवाडीतूनच होणार, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आंबोली येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.

Web Title: Sushant Khillare murder case: Karad was brought from Pandharpur 20 days ago, contacted mother on phone before death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.