सुशांत नाईक व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमीका घेतात!, उपनगराध्यक्ष बंडू हर्णेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 02:13 PM2022-05-14T14:13:35+5:302022-05-14T14:13:58+5:30

कणकवली : आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायतीत भाजीविक्रेत्यांसाठी घेतलेल्या बैठकीवरुन शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक यांनी टीका केली होती. या ...

Sushant Naik takes a convenient role by looking at business interests, Criticism of Deputy Mayor Bandu Harne | सुशांत नाईक व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमीका घेतात!, उपनगराध्यक्ष बंडू हर्णेंची टीका

सुशांत नाईक व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमीका घेतात!, उपनगराध्यक्ष बंडू हर्णेंची टीका

googlenewsNext

कणकवली : आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायतीत भाजीविक्रेत्यांसाठी घेतलेल्या बैठकीवरुन शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक यांनी टीका केली होती. या टीकेला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे प्रत्युत्तर दिले आहे. आमदार राणे यांच्यावर टीका करताना नगरसेवक सुशांत नाईकांनी स्वतः कणकवली शहरात नवीन प्रकल्पांना विरोध किती केला? त्याचा अभ्यास करावा. आमदार राणे हे नगरपंचायत व जनतेचे हित पाहून काम करतात. तर नाईक हे आपले व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमिका घेतात अशी टीका हर्णे यांनी केली आहे.
     
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कणकवली शहरातील भाजी मार्केट होता नये याकरिता नगरपंचायतमध्ये पहिला हात वर करणारे सुशांत नाईक होते. नगरपंचायतची कचरा निविदा आपल्याला मिळवण्यासाठी नाईक यांनीच पैसे गुंतवले होते अशी चर्चा कणकवलीत होती. या कामाकरिता धुळ्याच्या ठेकेदार कंपनीला नाईक यांनी त्यांचे भाऊ आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत कणकवलीत आणले होते. अशीही चर्चा आहे. आटोकाट प्रयत्न करून कचरा टेंडर त्यांनाच मिळाले होते. मग ते काम सुरू का केले नाही?

कचऱ्याचा प्रश्न जटिल करून सत्ताधारी म्हणून आम्हाला अडचणीत आणण्याचा त्यांचा डाव फसला आहे. आपले पैसे गुंतवले हे नाव उघड झाल्यामुळे नाईक हे ऐनवेळी नेहमीप्रमाणे उघडे पडले. कचरा निविदेबाबत बोलणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपल्या आमदार भावाला हाताशी धरून आणलेली धुळेची एजन्सी जर अधिकृत होती तर कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्या एजन्सीने काम का सुरू केले नाही? असा सवाल हर्णे यांनी केला.

शहरात अनधिकृत बांधकामे करून शहरवासीयांची फसवणूक करण्याचे कामच सुशांत नाईक यांनी आतापर्यंत केले. पार्किंगमध्ये गाळे कोणी बांधले ते देखील वेळ आली तर आम्ही दाखवून देऊ शकतो. श्रीधर नाईक उद्यानासाठी ७५ लाख नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंजूर करून आणले. आपल्या वडिलांच्या नावाने असलेल्या उद्यानाला सुद्धा सुशांत नाईक यांना राज्यात सत्ता असून देखील निधी आणता आला नाही. आमदार वैभव नाईक नगरपरिषदेच्या कारभारात सर्वच ठिकाणी लक्ष देऊ लागल्याने तेथील तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कंटाळून राजीनामा दिला. ही वस्तुस्थिती नाईक यांनी आपले भाऊ आमदार वैभव नाईक यांच्या कडून तपासून घ्यावी असा टोलाही हर्णे यांनी लगावला.

Web Title: Sushant Naik takes a convenient role by looking at business interests, Criticism of Deputy Mayor Bandu Harne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.