बनावट कॉल्सचा सुळसुळाट

By admin | Published: September 16, 2016 09:30 PM2016-09-16T21:30:29+5:302016-09-16T23:49:57+5:30

पोलिसांकडून जागृती : नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे

Suspend Counterfeit Calls | बनावट कॉल्सचा सुळसुळाट

बनावट कॉल्सचा सुळसुळाट

Next

मालवण : अलीकडील काही काळात बनावट कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जनजागृती करूनही सुशिक्षित नागरिक फसले जात आहेत. कॉल करणाऱ्या संबंधित कंपनीकडून दाखविण्यात येणाऱ्या आर्थिक प्रलोभनांना अनेकजण बळी पडत असून, त्यांच्यावर पश्चात्ताप करत बसण्याची वेळ आली आहे.
बनावट कॉल्सचा सुळसुळाट फार वाढला असून विविध आर्थिक आमिषांची गाजरे दाखवून क्षणार्धात ‘कंगाल’ करण्याची किमया बनावट कॉल्सधारक करत आहे. याबाबत पोलिसांकडून वारंवार जागृती केली जात असली तरी बनावट कॉल्सच्या मुळापर्यंत पोहोचण्यास यश मिळाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अशा कॉल्सचा धुमाकूळ थांबणार तरी कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मालवण शहरातील अनेक जणांना आॅगस्ट महिन्यात बनावट कॉल्सनी हैराण केले होते. सर्वसामान्यांसह शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, राजकीय पदाधिकारी यांना अशा पद्धतीने कॉल्स आले होते. मात्र, यातील एकानेही त्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता सावधगिरी बाळगली. मात्र, काहीजण प्रलोभनाला बळी पडतात. भारतभर मोबाईलचे जाळे व्यापक बनल्याने कोणत्याही प्रांतातून फोन येतात. अधिकतर ते बँकेतून बोलतोय, एटीएम अपडेट करायच्या बहाण्याने गंडा घालतात, तर काही विमा पॉलिसीसाठी तुमची निवड झाली असून काही रक्कम भरणा करा, असे सांगतात. तुम्ही लाखो डॉलर्सचे बक्षीस जिंकला आहात, दिलेल्या खात्यात पैसे भरा मग तुमचे बक्षीस अदा केली जाईल, अशा बनावट मेल्स आणि कॉल्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारच्या कॉल्सला प्रतिसाद देणाऱ्या अनेकांची फसवणूक झाल्यामुळे त्यांच्यावर मन:स्ताप सहन करण्याची वेळ येत आहे. मालवणात दोन दिवसांपूर्वी एका युवकाला कर्जाचे आमिष दाखवून दोन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. (प्रतिनिधी)


पोलिसांकडून जागरूकता पण...
बनावट कॉल्स तसेच फसवणुकीबाबत पोलिस प्रशासनाकडून दखल घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी फसवणुकीचा धंदा करणाऱ्यांबाबत जनजागृती फलक लावण्यात येत
आहेत.
मात्र, एखादा नागरिक बनावट कॉल्सच्या प्रलोभनास बळी पडला
तर त्याला न्याय मिळत नाही.
बनावट कॉल्स करणाऱ्या
व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास पोलिस अयशस्वी ठरले आहेत.
४फसवणूक करणाऱ्या संबंधितांना गजाआड करण्यासाठी
सायबर क्राईमअंतर्गत उपाययोजना होणे गरजेचे आहे.
गरजू पडतात बळी
गेल्या काही वर्षांत बनावट कॉल्सला अनेकजण बळी पडले असून, यातील अनेकांना पैशाची गरज असते. त्यांच्या दुर्दैवाने अशाच वेळी एखादा कॉल आल्यास ते आपली वस्तुस्थिती सांगून बँक नंबर, पिन नंबर देऊन मोकळे होतात. काहीवेळा तर उसने पैसे घेऊन संबंधिताच्या खात्यात जमा करावे लागतात. अशा घटना घडत असताना हे प्रकार मात्र थांबत नाहीत. बनावट कॉलच्या भूलभुलैयाला अधिकारी वर्गही भुलला असून 'कंगाल' होण्याची नामुष्की ओढवल्याच्या घटना घडल्या आहेत. बनावट कॉल्सद्वारे आर्थिक फसवणुकीचा धंदा काही भामट्यांनी सुरू केला असून, याबाबत पोलिसांत तक्रारी येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

'त्यांची' अशीही दहशत
सुज्ञ नागरिकाने बनावट कॉल्सधारकांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला तर ते उलटपक्षी धमकी देताना शिवीगाळ करून कॉल्स कट करतात.
त्यानंतर त्याच नंबरवर कॉल करून त्यांना पोलिसात तक्रार दिली आहे, असे सांगितल्यावर आमच्या नावाची तुम्ही बदनामी केली आहात. तुमच्याच विरोधात तक्रार दिली असून तुम्हालाच पोलिस पकडतील. शिवाय शिवीगाळ करूनही फोन कट करण्याचे प्रतापही केले जातात.

Web Title: Suspend Counterfeit Calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.