स्वाभिमान, शिवसेनेच्या नेत्यांनी नाणारबद्दल फेरविचार करावा : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:15 PM2019-06-28T13:15:23+5:302019-06-28T13:17:34+5:30

नाणार प्रकल्पाबाबत संबधित चौदा गावातील आठ हजार एकर जमिनीच्या मालकांनी प्रकल्पासाठी जागा देण्याचे कबूल करीत आपले समर्थन नोटरी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. संबंधित जमिन मालकांनी नाणार प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली आहे. तसेच ज्या गावांमध्ये विरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़ अशी मागणीही त्या जमिन मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व स्वाभिमान पक्षप्रमुख नारायण राणे यांनी नाणार बद्दल फेरविचार करावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.

Swabhiman, Shiv Sena leaders should reconsider Natar: Pramod Jathar | स्वाभिमान, शिवसेनेच्या नेत्यांनी नाणारबद्दल फेरविचार करावा : प्रमोद जठार

स्वाभिमान, शिवसेनेच्या नेत्यांनी नाणारबद्दल फेरविचार करावा : प्रमोद जठार

Next
ठळक मुद्देस्वाभिमान, शिवसेनेच्या नेत्यांनी नाणारबद्दल फेरविचार करावा :  प्रमोद जठार यांचे आवाहनविरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़

कणकवली : नाणार प्रकल्पाबाबत संबधित चौदा गावातील आठ हजार एकर जमिनीच्या मालकांनी प्रकल्पासाठी जागा देण्याचे कबूल करीत आपले समर्थन नोटरी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. संबंधित जमिन मालकांनी नाणार प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली आहे. तसेच ज्या गावांमध्ये विरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़ अशी मागणीही त्या जमिन मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व स्वाभिमान पक्षप्रमुख नारायण राणे यांनी नाणार बद्दल फेरविचार करावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.

कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि़ल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, सरचिटणीस रविंद्र शेटये, चंद्रकांत हरयाण, बाबा कोकाटे, अरविंद कुडतरकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमोद जठार पुढे म्हणाले, नाणार रिफायनरी हा कोकणात आर्थिक क्रांती घडविणारा मोठा प्रकल्प आहे. १३ हजार एकर जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक असून त्यापैकी बाधीत गावांतील आठ हजार एकर जमीन असलेल्या शोतकऱ्यांनी प्रकल्पाला समर्थन दिले आहे. निवडणुकांमध्ये राजकीय लाभासाठी नाणारला विरोधाचे राजकारण झाले़ आहे. ज्या स्वाभिमानने गिर्येत प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने भुमिका बजावली. तेथील बुथवर केवळ ६० मते राणेंना मिळाली आहेत. त्यामुळे राजकीय लाभ किंवा श्रेयवादात न अडकता बेरोजगारांच्या पोटापाण्यासाठी हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत.

दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जनतेला प्रकल्प हवा असल्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका अनेकदा घेतली होती. त्यामुळे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी .

मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रोहा येथे स्थलांतरीत करण्याची घोषणा जरी केली असली तरी अजुनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांचे जर समर्थन असेल तर राजकीय मतभेद विसरून कोकणातील पुढील पिढीसाठी आपण सर्व पक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे़. रोहा येथे प्रकल्प होत असेल तर त्या ठिकाणी प्रदुषण होणार नाही का? त्या ठिकाणी राष्ट्रवादीसह शिवसेनेचे समर्थन मिळाले आहे़. केवळ शेकापचा विरोध दिसत आहे़ . तर दुसरीकडे स्वाभिमान पक्ष तिथपर्यंत अद्यापही पोहोचला नाही, असा टोला प्रमोद जठार यांनी यावेळी लगावला.

प्रमोद जठार पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, तळेरे या चारही बसस्थानकांच्या प्रश्नी प्रभारी विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांची मी भेट घेतली. वैभववाडी बसस्थानकाचा प्रश्न २२५ स्क्वेअरमिटर जागेच्या वादात अडकला आहे़ . हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा राहिला आहे़. या बसस्थानकाबरोबरच कणकवली, तळेरे, आणि देवगड या तिनही बसस्थानकांच्या नुतणीकरणाचा प्रस्ताव घेऊन येत्या आठ दिवसात मंत्रालयात संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन अद्ययावत बसस्थानक तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

Web Title: Swabhiman, Shiv Sena leaders should reconsider Natar: Pramod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.