‘वक्रतुंड’ची ‘घागर’ करंडकाने भरली
By admin | Published: December 25, 2015 10:42 PM2015-12-25T22:42:59+5:302015-12-26T00:07:58+5:30
छंदोत्सवाची सांगता : बालगंधर्वची ‘एक अपूर्ण’ द्वितीय ; चेकमेटची ‘डू आॅर डाय’ तृतीय
रत्नागिरी : विद्यार्थ्यांमधील रंगकर्मी घडवणारी शामराव करंडक एकांकिका स्पर्धा अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात नुकतीच पार पडली. ‘शब्द एक अविष्कार अनेक’ या संकल्पनेनुसार होणाऱ्या या स्पर्धेत यावर्षी ‘इंद्रधनू’ हा विषय देण्यात आला होता. त्यानुसार आठ संघांनी स्पर्धेत एकांकिकांचे सादरीकरण केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातील वक्रतुंडने सादर केलेल्या ‘घागर’ एकांकिकेने शामराव करंडकावर आपले नाव कोरले.
बालगंधर्वच्या ‘एक अपूर्ण’ने व्दितीय आणि चेकमेट क्रिएशन्सच्या ‘डू आॅर डाय’ या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला. दिग्दर्शनाकरिता मीरा जालगावकर (प्रथम), चिन्मय रानडे (व्दितीय) व अनिकेत आपटे (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रंगकर्मी राजन मलुष्टे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कार्यवाह अॅड. प्राची जोशी, शालेय समितीचे सदस्य मंदार सावंतदेसाई, गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य श्रीकृष्ण जोशी, पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ, एम. सी. व्ही. सी. विभागाचे पर्यवेक्षक प्रा. माधव पालकर, ‘छंदोत्सव’ प्रमुख प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रा. सुशील वाघधरे, प्रा. महेश नाईक, प्रा. दत्तात्रय वालावलकर, प्रा. महेश नाईक, प्रा. आनंद आंबेकर, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. चिंंतामणी दामले, परीक्षक डॉ. गजानन रानडे, नरेंश पांचाळ, सुहास साळवी यांच्या उपस्थितीत पार पडले.
सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक प्रथमेश कोटकर (घागर) याला तर सारिका पोंक्षे (अपूर्ण) व्दितीय, अक्षय शिवगण (मृगजळ) याला तृतीय पारितोषिक मिळाले. दिग्दर्शनात अनिकेत आपटे (प्रथम), चिन्मय रानडे (व्दितीय) आणि मीरा खालगांवकर (तृतीय) हे विद्यार्थी यशस्वी ठरले.
पुरुष अभिनयाकरिता प्रथम क्रमांक विजय सुतार, व्दितीय प्रथमेश कोटकर आणि तृतीय आनंद मुकादम यांना तर स्त्री अभिनयासाठी प्रथम क्रमांक ऋता प्रसादे, व्दितीय पायल कदम, तृतीय ऋताली सावंत यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट तांत्रिक अंगाचे पारितोषिक ‘घागर’ या एकांकिकेला प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेकरिता प्रथम क्रमांक भूषण प्रभाकर पर्शराम, व्दितीय व्टिंंकल महाडिक, तृतीय मीरा खालगावकर तर सर्वोत्कृष्ट नैपथ्याकरिता अमरसिंंह जमादार याला प्रथम, पूनम पोटफोडे व्दितीय व सुशील परब तृतीय क्रमांक यांना गौरविण्यात आले.
समूह नृत्य स्पर्धेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वक्रतुंड ग्रुपने प्रथम, प्रारंभ ग्रुप व्दितीय तर डॅझलर्स ग्रुपला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सोलो डान्समध्ये वैभवी पवार, आसावरी आखाडे व कल्पेश हातखंबकर यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळाला. गीतगायन स्पर्धेत प्रणव घळसासी, चैत्राली देसाई व सायली मुळ्ये यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळाला.
फुड फेस्टमध्ये चव, स्वच्छता आणि पर्यावरणीय जाणीव या निकषांकरिता ‘टेस्ट पॉवर’ ग्रुपला, सजावट व सादरीकरणाकरीता ‘स्नॅक शॅक’, ग्राहक संवादासाठी ‘टेस्टी कॉर्नर’, जाहिरात कौशल्यासाठी ‘यंग शेफ’ या ग्रुपना सन्मानित करण्यात आले. स्ट्रीट पाव मसाला देणारा ‘स्नॅक शॅक’ ग्रुपचा स्टॉल सर्वोत्कृष्ट ठरला. तर ‘फॅब टेस्ट’ला व्दितीय आणि व्हेज क्रिस्पी देणाऱ्या ‘गुड नाईट’ स्टॉलला तृतीय क्रमांक देण्यात आला.
‘फोटोजेनिक फेस’ स्पर्धेत प्रतिक गावडे व सिमरन शेख यांनी बाजी मारली. फॅन्सी ड्रेसमध्ये श्रध्दा मोहिते (नर्स), मुस्कान सुभेदार (गांगा), माहिरा लांबे (मस्तानी) हे स्पर्धक विजयी झाले. (प्रतिनिधी)
विविध स्पर्धा : सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, मंगल पुरस्कार प्रदान
गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छंदोत्सवाची सांगता होताना गीतगायन, नृत्य, फूड फेस्ट या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बारावी कला शाखेमधील विद्यार्थिनी चिन्मयी मटांगे हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून तर बारावी कला शाखेतील विजय सुतार याला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. बारावी वाणिज्य शाखेची आसावरी आखाडे हिला ‘मंगल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या महोत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण होते.
सेल्फीची क्रेझ
ग्रुप सेल्फी स्पर्धेसाठी यश चांदे, क्षितिजा कारेकर व अद्वैत गर्दे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. तर वैयक्तिक सेल्फीत प्रतिक गावडे व युक्ता शेवडे यांचे सेल्फी सर्वोत्कृष्ट ठरले.