विनायक राउत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; सावंतवाडीत भाजपकडून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 07:13 PM2021-02-12T19:13:56+5:302021-02-12T19:15:25+5:30
घटनास्थळी पोलिस मात्र दिसले नाहीत. या आंदोनलनानंतर पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी तसेच बंदोबस्त ठेवला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राउत यांना कुठेही मिळाल्यावर फटकवू असे म्हणताच त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्यूतर दिले.त्यानंतर शिवसेना भाजप मधील वाद चांगलाच वाढत गेला असून,शुक्रवारी शिवसेनेने निलेश राणे यांचा पुतळा जाळला तर त्याला प्रत्युतर म्हणून सावंतवाडीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राउत यांचा पुतळा जाळून चप्पल मार आंदोलन करण्यात आले.सालईवाडा परिसरात हे आंदोलन करण्यत आले.
यामध्ये नगराध्यक्ष संजू परब,नगरसेवक आनंद नेवगी,सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर,दिलीप भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान नगरसेविका दिपाली भालेकर,परिणीती वर्तक, बटी पुरोहित,सभापती मिनल धुरी,परिशीत माजरेकर आदि सहभागगी झाले होते.
गेले चार दिवस शिवसेना भाजप मध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे.त्यांचा दुसरा अंक शुक्रवारी जिल्हयात पाहिला मिळाला ओरोस येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केल्याचे ताजे असतनाच सावंतवाडीत खासदार विनायक राउत यांंच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वता हातात चप्पल घेउन राउत यांंच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन केले.भाजप ने अचानक आंदोलन केल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारबंळ उडाली होती.
घटनास्थळी पोलिस मात्र दिसले नाहीत. या आंदोनलनानंतर पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी तसेच बंदोबस्त ठेवला होता.