निकृष्ट दर्जाचे महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 06:18 PM2021-07-20T18:18:53+5:302021-07-20T18:20:48+5:30
Highway Kankvali Ncp Sindhudurg : कणकवली येथील एस. एम.हायस्कूलसमोर बॉक्सेलचा काही भाग दोन वेळा कोसळला आहे. या सर्व गोष्टीचा नाहक त्रास नागरीकांना होत असल्याने याची चौकशी करुन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. काहि ठिकाणी कॉक्रीटला भेगा पडलेल्या आहेत. रस्ते साईडपट्टी खचलेली आहे. भराव वाहून गेलेला आहे .
कणकवली येथील एस. एम.हायस्कूलसमोर बॉक्सेलचा काही भाग दोन वेळा कोसळला आहे. या सर्व गोष्टीचा नाहक त्रास नागरीकांना होत असल्याने याची चौकशी करुन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर,कणकवली युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर,अजय जाधव, देवेंद्र पिळणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. चुकिच्या दिशादर्शक फलकामुळे अपघातास आमंत्रण दिले जात आहे.
या सर्व गोष्टींची तक्रार वारंवार शासन दरबारी करुनसुद्धा याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे प्रशासन आणि संबंधीत ठेकेदार यांचे साटेलोटे असण्याचा संशय नागरीकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व बाबींची व्यवस्थित चौकशी करुन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. असेही निवेदनात म्हटले आहे.