गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Published: March 28, 2016 11:03 PM2016-03-28T23:03:56+5:302016-03-29T00:33:11+5:30

सदाशिव ओगले यांची मागणी : जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा

Take action on the development of the village development officers | गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा

गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा

Next

सिंधुुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गुरांचे गोठे बांधण्यासाठीचे शेतकऱ्यांमार्फत ३00 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ तीनच गोठ्यांना देवगड गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्ताव परिपूर्ण असतानाही जाणूनबुजून गटविकास अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप सदस्य सदाशिव ओगले यांनी करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती दिलीप रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सदस्य संदेश सावंत, सदाशिव ओगले, रूक्मिणी कांदळगावकर, दिपलक्ष्मी पडते, समिती सचिव तथा बांधकामचे कार्यकारी अभियंता सुनील साळोखे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सभेत आढावा घेण्यात आला. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्याला ९ कोटी ५५ लाख, ४५ हजाराचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्याची पूर्तता करताना १0 कोटी ४२ लाख रूपयांचे काम या योजनेअंतर्गत झाले आहे.
२ लाख ९८ हजार मनुष्य दिनाच्या अनुषंगाने २ लाख ९४ हजार मनुष्य दिन भरलेले आहेत, अशी माहिती सभागृहात देत असतानाच सदाशिव ओगले यांनी गुरांच्या गोठ्या संदर्भातील माहिती मागविली. यावेळी देवगड तालुक्यात ३00 गोठ्यांचे प्रस्ताव आले असून यापैकी तीन कामांना मान्यता देण्यात आली आहे, असे सांगताच सदा ओगले आक्रमक झाले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गोठ्यांच्या बांधकामाला मागणी असतानाही देवगड गटविकास अधिकारी हेतुपुरस्पर मान्यता देत नाहीत. अशा अधिकाऱ्यावर कारवाई होणे उचित असल्याचे त्यांनी सभागृहात सांगत तशी मागणी केली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना या कामांचा तपशील घेऊन आपल्या दालनात उपस्थित राहण्याच्या सूचना सभापती दिलीप रावराणे यांनी दिल्या.
बांधकाम समितीची आजच्या सभेवर मार्च एडिंगचा प्रभाव पदोपदी जाणवून येत होता. (प्रतिनिधी)


शिक्षण विभागाचे २ कोटी मागे जाणार?
शिक्षण विभागाला शाळांच्या दुरूस्तीसाठी सन २0१४-१५ मध्ये २ कोटी १२ लाख रूपये मंजूर झाले होते. हा निधी मार्च २0१६ पर्यंत खर्च करणे गरजेचे असतानादेखील अद्यापपर्यंत हा निधी अखर्चित राहिला असल्याचे सभागृहात उघड झाले. यावेळी सदस्य संदेश सावंत यांनी शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांना धारेवर धरत हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च कसा होणार असा सवाल केला. यावर धाकोरकर म्हणाले, जास्तीत जास्त कामे ही तीन लाखाच्या आतील असल्याने निविदा प्रक्रिया मागवून पैसे खर्ची पाडू असे सांगितले. तर बांधकामचे कार्यकारी अभियंता साळोखे म्हणाले, या प्राप्त २ कोटी, १२ लाखांपैकी जेमतेम ५0 टक्के निधी खर्च होणार आहे. उर्वरीत निधी मागे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाले आहे.


जिल्ह्यात पाणीटंचाई लागली जाणवू
जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारण्याचे ४९ प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ दोनच प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, अशी माहिती या विभागाकडून देण्यात आली. पाणीटंचाईच्या कामांचे ४९ प्रस्ताव सादर झाल्याने जिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसायला सुरूवात झाली आहे.


सुनील साळोखे यांचे केले कौतुक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील साळोखे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केले. आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांप्रमाणे इतरांनी काम करावे. याबद्दल संदेश सावंत, सदाशिव ओगले यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सभापती दिलीप रावराणे यांनी त्यांचा सत्कार केला.

Web Title: Take action on the development of the village development officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.