जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांवर कारवाई करा : वाहनांवरही कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:28 PM2020-04-16T17:28:39+5:302020-04-16T17:29:33+5:30

आडमार्गाने तालुक्यात लोक येत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे असे आडमार्ग तत्काळ बंद करावेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घ्यावी, असे पोलिसांना सांगितले. मात्र, बांधकाम विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाकारे यांनी सांगितले.

Take action on those coming from outside the district | जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांवर कारवाई करा : वाहनांवरही कारवाईचे आदेश

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांवर कारवाई करा : वाहनांवरही कारवाईचे आदेश

Next
ठळक मुद्दे उदय सामंत यांचे आदेश ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला प्रशासकीय आढावा

वैभववाडी : लॉकडाऊन काळात संचारबंदी मोडून जिल्ह्याबाहेरून येणाºया व्यक्तींबरोबरच त्यांनी प्रवास केलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच तालुक्यात येणारे सर्व आडमार्ग तातडीने आजच बंद करण्याची ताकीद त्यांनी बांधकाम विभागाला दिली आहे.

पालकमंत्री सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात प्रशासकीय आढावा घेतला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, तहसीलदार रामदास झळके, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, मुख्याधिकारी सूरज कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे आदी उपस्थित होते.

सामंत यांनी प्रशासनाचे कौतुक करीत जिल्ह्यातील ९० टक्के जनतेने घरात राहून प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पुढेही अशीच स्थिती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करतानाच एकाद्या व्यक्तीमुळे संपूर्ण गाव, तालुका, जिल्ह्याला त्रास होणार असेल तर अशांना सरकारी विलगीकरण कक्षात पाठविण्याची सूचना आरोग्य विभागास केली.

आडमार्गाने तालुक्यात लोक येत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे असे आडमार्ग तत्काळ बंद करावेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घ्यावी, असे पोलिसांना सांगितले. मात्र, बांधकाम विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाकारे यांनी सांगितले.

त्यामुळे सामंत यांनी तत्काळ बांधकामच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज सायंकाळपर्यंत तहसीलदार व पोलीस यांच्यासमवेत बसून चोरवाटा बंद करण्यासंबंधी निर्णय घेण्याची सूचना केली. बांधकामकडून सहकार्य न मिळाल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे संकेतही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

लेखी तक्रार
संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असताना चार दिवसांपूर्वी पुण्यातून वेंगसर येथे दाखल झालेल्या तरुणास तातडीने ह्यइन्स्टीट्यूशन क्वॉरंटाईनह्णमध्ये पाठविण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आरोग्य विभागाला दिले. याबाबत वेंगसरचे सरपंच रामदास पावसकर यांनी पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडी तहसील कार्यालयात कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी रामदास झळके, सतीश सावंत, संदेश पारकर, अक्षता जैतापकर, दत्तात्रय बाकारे आदी उपस्थित होते.

Web Title: Take action on those coming from outside the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.