सकारात्मक संस्कार होतील याची काळजी घ्या : सदाशिव पांचाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:44 PM2017-09-27T16:44:25+5:302017-09-27T16:45:13+5:30
तळेरे : मुलांच्या यश- अपयशात पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. ह्यतुला काहीच कळत नाही , ह्यतु वेंधळा आहेसह्ण, ह्यतुला हे आयुष्यात कधीही जमणार नाहीह्ण या सारख्या नकारात्मक वक्तव्याचा मुलांवर फार भयानक परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांच्या मनावर सकारात्मक संस्कार होतील, याची काळजी पालकांनीच घ्यायला हवी, असे प्रतिपादन तळेरे येथील माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनी नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात केले.
नवी मुंबई - खारघर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांच्या मार्गदर्शनाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता मगर, ज्येष्ठ पदवीधर शिक्षक सचिन पाटील, सुमित्रा खेडकर, कविता पाटील, भाविका घोलप, राजेंद्र मोकल, विशाखा नाईक, सारिका पाटील, स्मिता सावंत, अरविंद घुगे, श्रीकांत सुतार आदी मान्यवर, शिक्षक उपस्थित होते.
माणसाचे सुख आणि दुख:, माणसाचे यश आणि अपयश मेंदुतून निर्माण होते. लहान मुलांचा मेंदू कॉम्प्युटरसारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे. तरच विद्यार्थी खºयाअर्थाने हुशार बनतील. त्यांच्यात एक आत्मविश्वास राहिल. आय कॅन डू इट हा विचार मुलांमध्ये विकसित करणे हे पालक - शिक्षक यांचे कर्तव्य आहे, असे सदाशिव पांचाळ यांनी सांगितले.
याच विद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी झालेल्या मार्गदर्शनानंतर मार्इंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनी शिक्षकांनाही मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन पांचाळ यांनी शिक्षकांचे समाधान केले. श्रीकांत सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पांचाळ यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. पाहुण्यांची ओळख सचिन पाटील यांनी केली तर आभार प्रदर्शन राजेंद्र मोकल यांनी केले.