भान ठेवून पालकमंत्र्यांवर आरोप करा

By admin | Published: January 9, 2016 11:54 PM2016-01-09T23:54:09+5:302016-01-09T23:54:09+5:30

नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यावर केला पलटवार

Take the charge and accuse the Guardian | भान ठेवून पालकमंत्र्यांवर आरोप करा

भान ठेवून पालकमंत्र्यांवर आरोप करा

Next

सावंतवाडी : आम्ही युतीत असून, शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यांचे भान ठेवून पालकमंत्र्यांवर आरोप करा. आम्ही हातात काही बांगड्या भरल्या नाहीत, असा पलटवार शिवसेनेच्या नेत्या तथा नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यावर केला आहे. त्या सावंतवाडी पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी राजन पोकळे यांनी पालकमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पालकमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. तर प्रशासनासह पालकमंत्र्यांना योग्यवेळी झटके देऊ, असे म्हटले होते. त्यावर नगरसेविका अनारोजीन लोबो म्हणाल्या, झटके कसले देणार ते पहिले सांगा. झटके देण्याची नुसती भाषा करू नका. शिवसेना-भाजप राज्यात सत्तेत असून, दोघांनीही एकत्र राहिले पाहिजे. पालकमंत्री विकास करतात. पण काही ठिकाणी ते निर्णय हळू घेतात. म्हणून टोकाची भाषा वापरणे योग्य नाही. भविष्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. दोघांना ऐकामेकांची गरज लागणार आहे. मग टीका कशासाठी करता? असा सवालही लोबो यांनी उपस्थित केला.
काळसेकर झटक्याची भाषा करीत असतील तर तुमच्या झटक्यांना शिवसैनिक जशास तसे उत्तर देतील, असेही यावेळी लोबो यांनी भाजपला सुनावले आहे. केसरकर हे राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे आम्हाला सतत भेटतील अशी अपेक्षा करणे योग्य नसून, त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे काम करण्याची ताकद आहे. ते निर्णय हळूहळू घेत असतील. पण ते निर्णय योग्यच असतील. त्यामुळे सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे, असे पोकळे म्हणाले. (प्रतिनिधी)
काका कुडाळकरांचा अनारोजीन लोबोंना टोला
झटके द्यायला आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, असे म्हणणाऱ्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांना यानिमित्ताने बांगड्या भरण्याची सवय होईल, असा उपरोधिक टोला भाजपचे नेते काका कुडाळकर यांनी हाणला. लोबो यांच्या टीकेचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. ते भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना-भाजपच्या वाक्युध्द गेले दोन सुरू असून, शनिवारी शिवसेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी अतुल काळसेकर यांच्यावर टीका केली. या टिकेला कुडाळकर यांनी उत्तर दिले. काळसेकर यांनी काम होत नसल्याबाबत आपली भूमिका मांडली. मग त्यावर टीका कशाला केली पाहिजे आणि लोबो यांना एवढीच जर बांगड्या भरण्याची हौस असेल, तर त्यांनी त्या भराव्यात. त्यानिमित्ताने त्यांना सवय होईल. आम्हाला सत्तेचे भान आहे. याचे ज्ञान अन्य कोणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असेही कुडाळकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Take the charge and accuse the Guardian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.