सावित्रीबार्इंचा आदर्श घ्या

By admin | Published: March 9, 2015 09:14 PM2015-03-09T21:14:47+5:302015-03-09T23:53:17+5:30

एम. के. गावडे : वेंगुर्लेतील महिला दिनात मार्गदर्शन

Take Savitribai's ideals | सावित्रीबार्इंचा आदर्श घ्या

सावित्रीबार्इंचा आदर्श घ्या

Next

वेंगुर्ले : सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन प्रवाहात आणण्याचे अमूल्य कार्य के ले. त्यांचा आदर्श प्रत्येक महिलेने ठेवल्यास खऱ्या अर्थाने महिला सक्षम बनतील, असे विचार कृषीभूषण पुरस्कारप्राप्त एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे काढले.
वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सहकार विभागाचे श्रीकांत कावले, सावंतवाडी येथील युवा उद्योजक गुरू वारंग, संचालिका लीला परब तसेच क्वॉयर बोर्डाचे फिल्ड आॅफिसर शंकर नारायणन, सहकार अधिकारी आर. आर. परदेशी, सूर्यकांत फळ प्रक्रिया संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, माजी सरपंच दीपिका राणे, तृप्ती साळगावकर, श्वेता नाईक, देवगडच्या उद्योजिका रंजना कदम, उज्ज्वला साळगावकर, महिला काँग्रेस अध्यक्षा सुजाता देसाई, निधी परब, माधुरी गडेकर, लक्ष्मी परब, ज्योती वारंग, रक्षिता गोवेकर, मीरा सावंत, वैशाली गावडे, आदी महिला उपस्थित होत्या. महिला आरक्षणामुळे महिलांना अनेक क्षेत्रात संधी मिळाली आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे. त्याकरिता रोजगार व व्यवसायाची कास धरावी, तरच प्रगती साधू शकते, असे गावडे यांनी सांगितले. प्रज्ञा परब, शंकर नारायणन, श्रीकांत कावले यांनी विचार मांडले. आभार सुषमा भगत यांनी मानले. (वार्ताहर)

तरच प्रगती
आरक्षणामुळे महिलांना अनेक क्षेत्रात संधी मिळाली . त्यांनी कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे. त्याकरिता रोजगार व व्यवसायाची कास धरावी, तरच प्रगती साधू शकते.

Web Title: Take Savitribai's ideals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.