तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग सहा तासांनी सुरळीत;पोलीस व बांधकामचे अथक प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 10:47 PM2018-10-02T22:47:58+5:302018-10-02T23:17:14+5:30
चक्रिवादळामुळे झाडे कोसळून ठप्प झालेला तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल सहा तासानंतर सुरळीत झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा व पोलीसांनी
वैभववाडी(सिंधुदुर्ग): चक्रिवादळामुळे झाडे कोसळून ठप्प झालेला तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल सहा तासानंतर सुरळीत झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा व पोलीसांनी अथक परिश्रम घेत नाधवडे पिंपळवाडी येथे कोसळलेला जुनाट वटवृक्ष हटवून रात्री वाजता वाहतूक सुरु केली.
वादळी पावसामुळे मंगळवारी वैभववाडी तालुक्यात दाणादाण उडाली. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे ते कोकिसरे दरम्यान ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने सायंकाळी चारपासून मार्ग पुर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे काही वाहने अडकून पडली होती. तर या मार्गाची वाहतूक वैभववाडी फोंडामार्गे वळविण्यात आली होती. मात्र, वीजवाहीन्या व खांब तुटल्यामुळे कोकिसरे नाधवडे नापणे, कुसूर ही गावे अंधारात आहेत.
कोकिसरे नारकरवाडीपासून नाधवडेपर्यंत रस्त्यावर कोसळलेली झाडे हटविण्यास पाचच्या सुमारास पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली होती. रेल्वे फाटकाच्या पुढे नाधवडेपर्यंत मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याने दोन जेसीबी कार्यान्वित करण्यात आले होते. नाधवडे पिंपळवाडी येथे कोसळलेला जुनाट वटवृक्ष हटवून रात्री दहा वाजता तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यामुळे या महामार्गावरील वाहन चालक व प्रवाशांनी पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले.