डंपरची कारला धडक, अपघातात तालुका वैद्यकीय अधिकारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:59 AM2020-12-07T11:59:12+5:302020-12-07T12:01:05+5:30
accident, sawantwadi, sindhudurgnews सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्या कारला बुर्डी पुलाजवळ समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्या कारला बुर्डी पुलाजवळ समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांच्यासोबत असणारे आरोग्यसेवक संतोष तुळसकर हेही किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारच्या सुमारास घडला आहे.
सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर या आंबोली येथे गेल्या होत्या. तेथून परतत असताना आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरची धडक कारला बसली. या कारमधून शिरोडकर यांच्यासह एक आरोग्य कर्मचारी होता. सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. दोघांनाही येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.