तळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 03:30 PM2020-07-14T15:30:25+5:302020-07-14T15:37:01+5:30

सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील जोरदार पावसामुळे तळवडे येथील बाजारपेठ पुर्णतः पाण्याखाली गेली आहे.

Talwade market under water, loss of lakhs | तळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

तळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

Next
ठळक मुद्देतळवडे बाजारपेठ पाण्याखाली, लाखोंचे नुकसान१५० दुकानांत पुराचे पाणी : सावंतवाडी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सदस्यांकडून पाहणी

तळवडे : सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठ पूर्णत: पाण्याखाली गेली होती. यात व्यापाऱ्यांहचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तळवडे बाजारपेठेतील १५० दुकानांत पुराचे पाणी शिरून व्यापाऱ्यांच्या दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे.

तळवडे बाजारपेठेचे विस्तारीकरण झाल्याने पाण्याचा मार्ग काही ठिकाणी बंद झाला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने तळवडेत हाहाकार माजविला. शनिवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी तळवडे बाजारपेठ पूर्णत: पाण्याखाली गेली होती.

दुकानदारांच्या दुकानात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एका बाजूने कोरोनाचे संकट असताना आता मुसळधार पडणाºया पावसाच्या कहराने सर्वसामान्य व्यापारी आर्थिक डबघाईला आले आहेत.

तळवडे येथील पूर परिस्थितीची पाहणी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर, ग्रामसेवक तृप्ती राणे, तलाठी श्रुती मसुकर यांनी केली. यावेळी सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते.

तळवडे गावात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार असून नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन उपस्थित अधिकाºयांनी दिले.

महसूल यंत्रणा फक्त पंचनामे करते. मात्र, नुकसान भरपाई मिळण्यासाठी व्यापाºयांना अनेक दिवस वाट पहावी लागते. अखेर शेवटी त्रुटी काढून या नुकसानग्रस्त व्यापाºयांच्या पदरी निराशा येते, अशी खंत तळवडे बाजारपेठेतील व्यापाºयांनी यावेळी व्यक्त केली.

येथील व्यापारी सर्व कर भरूनही सरकारी यंत्रणा त्यांना नुकसान भरपाई देताना मुद्यावर बोट ठेवते. नुकसान भरपाई रकमेत कपात करते. त्यामुळे पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या व्यापाºयांना आतातरी लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तळवडे बाजारपेठेतील व्यापाºयांनी केली आहे.

अहवाल पाठविणार

तळवडे बाजारपेठेतील ज्या व्यापाºयांचे नुकसान झाले आहे त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार आहोत. तसेच सर्वसामान्य व्यापाºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यावेळी दि

 

 

Web Title: Talwade market under water, loss of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.