सिंधुदुर्ग: तळवडे गावाला वादळाचा फटका; घराचे पत्रे, छप्पर गेली उडून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 11:15 AM2022-08-13T11:15:17+5:302022-08-13T11:16:41+5:30
वादळात लाखों रुपयाचे नुकसान झाले आहे
तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावाला रात्री वादळी पावसाचा मोठा फटका बसला. वादळाने ग्रामस्थांना आर्थिक संकटात टाकले आहे. वादळात लाखों रुपयाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वीजतारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
वादळाने तडवडे गावात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळानंतर ग्रामस्थांनी स्वतः रस्त्यावर उतरून रस्ता साफ केला. यावेळी अनिल परब, प्रभाकर कांडरकर, आना परब, अरुण कांडरकर, प्रकाश कांडरकर, पपन कांडरकर, सागर कांडरकर, अविनाश कांडरकर, प्रमोद मेस्त्री, जगनाथ कांडरकर, जिजी परब. संदीप कांडरकर. प्रकाश परब तसेच अन्य ग्रामस्थ यावेळी रस्ता साफसफाई कामात सहभागी होते. गणेशोत्सवाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
वादळाने प्रथमेश परब यांच्या गॅरेजचे पत्रे छप्पर उडून ४० हजार, सीताराम कांडरकर यांचे ५० हजार, धनश्री कांडरकर २५ हजार, दशरथ कांडरकर २५ हजार, अरुण कांडरकर, शंकर कांडरकर ३० हजार, शरद मालवणकर यांच्या घरावर झाडे पडून जवळपास १ लाखांच्यावर नुकसान झाले आहे तर उदय परब, अनिल परब, मधुकर परब, मकरंद परब, अशोक परब, यांची केळीची झाडे उन्मळून पडली.