तामिळनाडूचा एन. श्रीनाथ विजेता
By admin | Published: November 30, 2015 09:52 PM2015-11-30T21:52:04+5:302015-12-01T00:14:19+5:30
आर. बी. सप्रे बुध्दिबळ स्पर्धा : फिडे रेटिंग रॅपिड स्पर्धा रत्नागिरीत
रत्नागिरी : चेसमेन, रत्नागिरी आयोजित आर. बी. सप्रे स्मृती फिडे रेटिंग रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत नवव्या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर तामिळनाडूचा नारायण श्रीनाथ व मध्यप्रदेशचा आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा यांच्यातील डावात श्रीनाथने राहुलचा ३५ व्या चालीला पराभव करुन आठ गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. ठाण्याचे नूबेरशहा शेख व राकेश कुलकर्णी यांच्यातील डावात राकेशने नुबेरचा ३० व्या चालीला पराभव करुन विजेतेपद पटकाविले तर नुबेरला सात गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुंबईच्या स्नेहल भोसले व हेमंत शर्मा यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता २८ व्या चालीला डाव बरोबरीत सोडवला. अर्ध्या गुणासह सात गुण मिळवून स्नेहलने आठवे तर हेमंतला सात गुणासह बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुण्याच्या सोहन फडके व प्रतीक मुळये यांच्यातील डावात दोघांनी वीसाव्या चालीला डाव बरोबरीत सोडवला. अर्ध्या गुणासह सोहनने सात गुणांसह पाचवे स्थान पटकाविले तर प्रतिकने सात गुणांसह तेरावे स्थान पटकाविले. मुंबईचा हर्ष घाग व नाशिकचा विनोद भागवत यांच्यातील डावात दोघांनी ३५ व्या चालीला डाव बरोबरीत सोडवला. सात गुणांसह हर्ष घाग याने सहावे स्थान पटकाविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुधा सपे्रे, संभाजी पोळ, मोहन सपे्रे, दिलीप नवरे, विलास म्हांगे, चेसमन अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते संपन्न झाला. (प्रतिनिधी)
उत्कृष्ट २००० रेटींग विजेते सम्मेद शेटे, सॅमसन स्टॅनली, आंचल रस्तोगी, उत्कृष्ट १६०० रेटींग विजेते ओम बेर्डे, अभिषेक सांगले, पूनम बन्सोड, उत्कृष्ट बिगरमानांकित देवेंद्र मायदेव, केदार कोरडे, आयुष पेडणेकर, उत्कृष्ट महिला खेळाडू ऋचा पुजारी, मयूरी सावळकर, उत्कृष्ट वयस्कर खेळाडू उन्नी सी. एस. श्रीरामन नामबुद्ररी, उत्कृष्ट रत्नागिरी खेळाडू मुक्ताई देसाई, सिध्दांत सावंत, श्रेयश विध्वंस, उत्कृष्ट १५ वर्षाखालील अन्वित दामले, अथर्व चव्हाण, राहुल पवार, उत्कृष्ट १३ वर्षाखलील आदित्य सावळकर, रिध्दीकेश वेर्णेकर, अनुराग अडवलप, उत्कृष्ट ११ वर्षाखालील जी. माधवन, आयुष पाटील, देवांश नाईक, उत्कृष्ट ९ वर्षाखालील आयुष महाजन, ओम कदम, आलिया गायतोेंडे, उत्कृष्ट ७ वर्षाखालील साईराज वेर्णेकर, पार्थ कामत, कापडी शारमन.