कणकवली परिसरात बंद घरांना चोरटे करताहेत लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:27 PM2020-11-14T17:27:32+5:302020-11-14T17:29:18+5:30

कणकवली शहर तसेच परिसरात चोऱ्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यात लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. मात्र, या चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पोलीस दलातील वरीष्ठांनी ही बाब गंभिरपणे घेतली असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडाच बनविला आहे.

Targets on burglary of closed houses in Kankavli area | कणकवली परिसरात बंद घरांना चोरटे करताहेत लक्ष्य

कणकवली परिसरात बंद घरांना चोरटे करताहेत लक्ष्य

Next
ठळक मुद्देपोलिसांना दिली जबाबदारी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचा एक्शन प्लॅन

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात चोऱ्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यात लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. मात्र, या चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पोलीस दलातील वरीष्ठांनी ही बाब गंभिरपणे घेतली असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडाच बनविला आहे.

या चोऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यावर कणकवली पोलिसांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी कणकवली पोलीस ठाण्यात आता ठाण मांडून बसणार आहेत.

कोरोनाचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या नागरिकांना चोरट्यांकडून दणका दिला जात आहे. कणकवली परिसरात अलीकडे मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. उद्योग , व्यवसाय बंद असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी काही व्यक्तींकडून चोरीचा मार्ग अवलंबला जात आहे का ? या दृष्टीने पोलिसांकडून तपास होणे आवश्यक आहे. दिवसाढवळ्या कणकवली साईनगर, वरचीवाडी येथे रोख रकमेसह दागिणे असा सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. तर ही घटना ताजी असतानाच त्याच रात्री चोरट्यांनी शहरातील बंद असलेला एक बंगला, दोन घरे तसेच चार फ्लॅटना लक्ष करत डल्ला मारला. त्यामध्ये रोख रक्कम, चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल गायब करण्यात आला.

शहरात एकाच रात्री सात ठिकाणी चोरीची घटना घडली. तर त्यानंतर आता कलमठ परिसरातही बंद घराना लक्ष करून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. त्यामुळे कणकवली परिसरात चोरट्यांची एखादी टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये स्थानिक चोरट्यांचा सहभाग आहे का ? याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

यापूर्वीही कणकवली शहरात स्थानिक युवकांच्या टोळीने चोरीचा प्रकार केला होता. आपल्या दैनंदिन चैनीसाठी चोऱ्या करून पैसे मिळविण्याचा प्रकार त्यावेळी उघड झाला होता. तसाच प्रकार या चोरीच्या वेळीही घडला आहे का? हे पोलिसांनी तपासणे आता आवश्यक आहे.

अतिरीक्त पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन

काही अल्पवयीन मुले दारू, गांजा अशा व्यसनांच्या आहारी गेली आहेत. त्यांच्याकडून चोरीचे प्रकार घडू शकतात. त्यापैकी काही मुलांचा चोरीप्रकरणात सहभाग आहे का ? यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तर निश्चितच काही धागेदोरे त्यांच्या हाती लागू शकतील. अन्यथा चोरट्यांना कोणाचा वचक नसल्याने त्यांच्याकडून पुन्हा शहरात व परिसरात मोठ्या चोरीच्या घटना घडू शकतील. त्यामुळे या चोरीच्या तपासात पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी चोरीच्या तपासाबाबत कणकवली पोलीस ठाण्याला भेट देत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर ऍक्शन प्लॅन बनविण्यात आला आहे.

Web Title: Targets on burglary of closed houses in Kankavli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.