‘कसरत’कार आत्माराम जाधव काळाच्या पडद्याआड

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 24, 2024 03:38 PM2024-01-24T15:38:38+5:302024-01-24T15:38:55+5:30

सिंधुदुर्ग : पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर स्वतंत्र निर्माण झालेला सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या शिक्षकी पेशाला न्याय ...

Teacher Atmaram Pundalik Jadhav passed away | ‘कसरत’कार आत्माराम जाधव काळाच्या पडद्याआड

‘कसरत’कार आत्माराम जाधव काळाच्या पडद्याआड

सिंधुदुर्ग : पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर स्वतंत्र निर्माण झालेला सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या शिक्षकी पेशाला न्याय देत अनेक विद्यार्थी घडविणारे प्राथमिक शिक्षक आणि अपग्रेड मुख्याध्यापक म्हणून काम केलेले प्रामाणिक, तळमळीचे शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविणारे आत्माराम पुंडलिक जाधव यांचे आज, बुधवारी (दि .२४) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.

सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय संघटनेचे ते वेंगुर्ला तालुकाध्यक्ष म्हणून काही काळ काम केले. कालकथित आत्माराम जाधव यांनी ‘कसरत’ हे आत्मकथन लिहिले असून, त्यांच्या या आत्मकथनाला ‘अस्मितादर्श’चा महत्त्वपूर्ण पुरस्कार लाभलेला आहे. या आत्मकथनात, त्यांच्या शिक्षकी पेशात त्यांना आलेल्या अनुभवांची मांडणी प्रत्ययास येते. त्यांच्या पश्चात भाऊ, मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.

सम्यक साहित्य संसदचे अध्यक्ष, प्रसंवाद या अनियतकालिकाचे संपादक व अपरांत प्रबोधिनीचे कार्यकारिणी सदस्य, अपरांत सिंधुदुर्ग शाखेचे कार्याध्यक्ष, इंजि. अनिल जाधव व राय. डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांचे ते वडील होत.

Web Title: Teacher Atmaram Pundalik Jadhav passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.