सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे कोटींचे टेक्निकल सेंटर सुरू होणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 01:26 PM2023-04-11T13:26:17+5:302023-04-11T13:26:39+5:30

'लवकरच पाचशे एकर क्षेत्रात आधुनिक टेक्नॉलॉजी असलेली इंडस्ट्रीज सिंधुदुर्गात आणण्यात येईल'

Technical center worth 200 crores will be started in Sindhudurg district, Information given by Union Minister Narayan Rane | सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे कोटींचे टेक्निकल सेंटर सुरू होणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली माहिती 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे कोटींचे टेक्निकल सेंटर सुरू होणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली माहिती 

googlenewsNext

कणकवली: येथील तरुणांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी ज्या  शिक्षणाची अपेक्षा आहे त्याबाबतचे प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले जाईल. त्यासाठी दोनशे कोटी रुपयाचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू केले जाणार आहे. चांगले प्रशिक्षण घेऊन उच्च प्रतीच्या नोकऱ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मिळविण्याची क्षमता येथील तरुण-तरुणींमध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचे प्रयत्न माझे सुरू आहेत. लवकरच पाचशे एकर क्षेत्रात आधुनिक टेक्नॉलॉजी असलेली इंडस्ट्रीज सिंधुदुर्गात आणण्यात येईल. अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.

शासनमान्य कोकण भूमी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उदघाटन रविवारी झाले. यावेळी  एस.एस.पी.एम  संस्थेच्या अध्यक्षा  निलम  राणे, सचिव आमदार नितेश राणे, सदस्य प्रगती नरे, कोकण भुमी टेक्नॉलॉजी इनक्युबेशन सेंटरचे डायरेक्टर अभिषेक तेंडुलकर, आसावरी राजोपाध्ये, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे तसेच कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, विकासाच्या बाबतीत मी नेहमीच आग्रही आहे आणि म्हणूनच कणकवलीत दोन वेळा माझ्या  मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योग प्रशिक्षण आणि प्रदर्शन कार्यक्रम घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३५० तरुण-तरुणींनी उद्योजक होण्यासाठी प्रस्ताव सादर केले. सकारात्मक दृष्टीने काम केल्यास असे यश आणखीन मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Technical center worth 200 crores will be started in Sindhudurg district, Information given by Union Minister Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.