महामार्गावरील हळवल फाटा येथे टेम्पो उलटला, अवघड वळणावर पुन्हा अपघात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 1, 2022 11:36 AM2022-10-01T11:36:32+5:302022-10-01T11:51:44+5:30
आतापर्यंत सहा ते सात वेळा याच ठिकाणी अपघात झाले असून तिघांनी आपले प्राण गमावले आहेत
कणकवली (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो हळवळ फाट्यावर असलेल्या अवघड वळणावर जाऊन पलटी झाला. हा टेम्पो तेथील टपऱ्यांवर जाऊन कोसळला. आज, शनिवारी पहाटे चार वाजता ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.
टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र येथील अवघड वळणावर ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. आतापर्यंत सहा ते सात वेळा याच ठिकाणी अपघात झाले असून तिघांनी आपले प्राण गमावले आहेत. हे वळण वाहनचालक यांच्यासाठी जीवघेणे ठरत आहे. तसेच त्या ठिकाणी असलेल्या टपऱ्यामुळे देखील मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या अपघातात जीवितहानी झाली नाही. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.