तार वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी केला हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:21 IST2021-07-05T18:19:59+5:302021-07-05T18:21:46+5:30
Crimenews Kudal Police Sindhurug : कोकण रेल्वे विद्युतीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तारांची चोरी उघड झाल्यानंतर कुडाळ पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. या तपासामध्ये रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणावर चोरीची तार आढळली असून ही तार वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला आहे.

तार वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी केला हस्तगत
कुडाळ : कोकण रेल्वे विद्युतीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तारांची चोरी उघड झाल्यानंतर कुडाळ पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. या तपासामध्ये रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणावर चोरीची तार आढळली असून ही तार वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कुडाळ रेल्वेस्थानक येथील रेल्वेच्या मालकीच्या गोदामात असलेली कोकण रेल्वे विद्युतीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारी तार सुपरवायझर सुशीलकुमार दास याने आपल्या रत्नागिरी येथील साथीदाराच्या सहकार्याने चोरली. ती तार रत्नागिरी येथील भंगारवाला मलिक याला विक्री केली होती. ही चोरी उघड झाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या आरोपींना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरीचा तपास पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्यासोबत पोलीस नाईक स्वप्निल तांबे, शशी प्रभू व सुबोध मळगावकर हे करीत आहेत.
दरम्यान रविवारी कुडाळ पोलीस ठाण्याचे हे पथक तपासासाठी रत्नागिरी येथे भंगारवाला मलिक याला घेऊन गेले होते. कुडाळवरून चोरलेली एल अँड टी कंपनीची तार या भंगारवाल्याने दाखविली. ही तार पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच कुडाळवरून रत्नागिरीपर्यंत या तारेची वाहतूक करणारा टेम्पोसुद्धा ताब्यात घेऊन हस्तगत केला आहे. याप्रकरणी या तारेची वाहतूक करणारा टेम्पो चालक याच्यावर गुन्हा दाखल होणार की तो साक्षीदार म्हणून असणार आहे हे तपासात पुढे येणार आहे.
तपास होणार
या प्रकरणात एकूण किती किमतीची तार चोरण्यात आली आहे हे अद्याप उघड झालेले नाही. ते सोमवारी उघड होईल. तसेच या प्रकरणात अजून कोण आरोपी आहेत का याचाही तपास होणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी सांगितले.