स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी बनविले तंबू
By admin | Published: January 19, 2015 09:24 PM2015-01-19T21:24:39+5:302015-01-20T00:07:17+5:30
पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या
वैभववाडी : येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर दोन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरामध्ये तंबू उभारणीसह शेकोटी कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. स्काऊट गाईड शिबिरात तंबू उभारणी कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चार तंबू उभारले. सायंकाळी शेकोटीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. यावेळी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनराव राणे, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधीक्षक जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे निवृत्त शिक्षक एस. आर. चोरगे, श्रीमती पडवळ तसेच स्काऊट गाईड विषयाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक नादकर, एस. बी. शिंदे यांनी तंबूचे निरीक्षण केले. दुसऱ्या दिवशी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर या शिबिराची सांगता झाली. (प्रतिनिधी)