तेरेखोल खाडीकिनारी पर्यटन प्रकल्पांची लवकरच सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:17 PM2020-11-13T12:17:41+5:302020-11-13T12:19:56+5:30

dipakkesrkar, sindhudurgnews आरोंदा किरणपाणी परिसरात तेरेखोल खाडीकिनारी पर्यटन प्रकल्पांची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच शेती संरक्षक बांधारे मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आरोंदा येथे दिले.

Terekhol creek tourism projects to start soon | तेरेखोल खाडीकिनारी पर्यटन प्रकल्पांची लवकरच सुरुवात

आरोंदा-किरणपाणी येथे दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी रुपेश राऊळ, राजन मुळीक, बाळ आरोंदेकर, विद्याधर नाईक, अशोक नाईक, बबन नाईक, आबा केरकर, प्रशांत नाईक, बाबू नाईक आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देतेरेखोल खाडीकिनारी पर्यटन प्रकल्पांची लवकरच सुरुवात दीपक केसरकर यांची माहिती : आरोंदा किरणपाणी येथे भेट

सावंतवाडी : आरोंदा किरणपाणी परिसरात तेरेखोल खाडीकिनारी पर्यटन प्रकल्पांची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच शेती संरक्षक बांधारे मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आरोंदा येथे दिले.

आरोंदा-किरणपाणी येथे दीपक केसरकर यांनी रविवारी भेट दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, आरोंदा बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी बाळ आरोंदेकर, विद्याधर नाईक, माजी उपसरपंच अशोक नाईक, बबन नाईक गावकर, शिवसेना विभागप्रमुख आबा केरकर, शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत नाईक, युवासेना पदाधिकारी बाबू नाईक आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

खाडी किनारपट्टीवरील सर्व शेती संरक्षक खारबंधारे दुरुस्त करून मजबूत करण्याचे काम प्रथम केले जाणार आहे. यानंतर पर्यटन प्रकल्पांची उभारणी केली जाईल. अधिकाधिक रोजगार निर्मिती करणारे पर्यटन प्रकल्प आणावे, अशी मागणी बाळ आरोंदेकर, अशोक नाईक यांनी केली. पर्यटन प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने पूर्ण तेरेखोल खाडीचा सचित्र आढावा घेणार असल्याचे यावेळी आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले.

कांदळवनाचे संरक्षण

आमदार केसरकर यांनी बोटीतून कार्यकर्त्यांसोबत तेरेखोल खाडीची सफर केली. यावेळी किनारपट्टीची पाहणी करतानाच या खाडी परिसरात असलेल्या कांदळवनाचाही आढावा घेतला. या भागात शेकडो एकर जमिनीत कांदळवन पसरले आहे. या कांदळवनाचा विकास पर्यटनदृष्ट्या करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. येथील कांदळवनाच्या संवर्धनाची गरज आहे. अन्यथा या खाडीतील जैवविविधता धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावर आमदार केसरकर यांनी कांदळवनाचे निश्चितपणे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले.

 

Web Title: Terekhol creek tourism projects to start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.