तेरेखोल नदी बनतेय मृत्यूचा सापळा

By admin | Published: April 27, 2015 09:40 PM2015-04-27T21:40:00+5:302015-04-28T00:46:52+5:30

शासन अनभिज्ञ : असुरक्षिततेमुळे मार्गदर्शन फलक, सुरक्षा रक्षक आवश्यक

Terekhol river becomes the trap of death | तेरेखोल नदी बनतेय मृत्यूचा सापळा

तेरेखोल नदी बनतेय मृत्यूचा सापळा

Next

महेश चव्हाण - ओटवणे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या आणि ओटवणे पंचक्रोशीतील जनतेची जीवनतारिणी असलेल्या तेरेखोल नदीची ओळख अलीकडच्या काळात ‘मृत्यूचा सापळा’ अशी बनू पाहत आहे. पर्यटनवाढीबरोबर येथील असुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यासाठी शासनाने सूचना फलकांसह मार्गदर्शक, सुरक्षारक्षक आणि गावासाठी आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बारमाही संथ गतीने वाहणारी आणि जनतेची तहान भागवणारी तेरेखोल (गडनदी) नदी सध्या दुर्दैवी प्रकारांनी ग्रासली आहे. बावळाट येथील घटनेने नदीच्या सौंदर्य, पर्यटनाला धक्का पोहोचला आहे. बावळाट येथील ‘कुत्र्यांची कोंड’ याठिकाणी बेळगावहून फिरायला आलेल्या कागाझो दाम्पत्याचा आठ दिवसांपूर्वी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.दगडावरून घसरून पडल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने या दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेने पर्यटनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. एका बाजूला १०० टक्के पर्यटनासाठी प्रयत्न करणारे शासन मात्र या घटनेनंतर मूग गिळून गप्प आहे. ओटवणे पंचक्रोशीतून बावळाट, सातोळी, सरमळे, दाभील, ओटवणे, विलवडे, वाफोली, बांदा अशी पुढे सरसावणारी तेरेखोल नदी असंख्य लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. ओटवणे, विलवडे, बावळाट या नदीपात्राच्या भागात तर याचे प्रमाण अधिक आहे. ओटवणे-सरमळे पुलानजीक भगात, पानवळ, सरमळे बावळाट क ोंड येथे अनेकजण मृत्यूच्या दाढेत ओढले गेले आहेत. गत पाच वर्षांचा विचार केल्यास वीसपेक्षा अधिक लोक बुडून मृत्युमुखी पडले आहेत. पर्यटनाचा कांगावा करणारे शासन मात्र यापासून अनभिज्ञ आहे. सावधानतेचे फलक लावणे गरजेचे ओटवणे पंचक्रोशीतून वाहणारी तेरेखोल नदी केवळ बारमाही वाहणारा जलप्रवाह नाही, तर सौंदर्याचा असुरक्षित अनमोल ठेवा आहे. माडभर खोली असलेल्या क ोंडी, रांजणखळगे, कुंभगर्ते आणि नैसर्गिक भोवरे या नदीपात्रात पहायला मिळतात. नैसर्गिक तसेच धार्मिक अधिवासात असलेल्या या नदीपात्राच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले येथे आपसूकच वळतात. मात्र, येथील परिसराची माहिती आणि पाण्याची खोली याबाबत माहिती नसल्याने काही जणांचा नाहक बळी जातो. यासाठी शासनस्तरावरून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील असुरक्षित पर्यटनस्थळांची माहिती देणारे फलक लावणे आवश्यक आहे. फलकांमध्ये सर्वोच्च खोली, रांजणखळगे, कुंभगर्ते, भोवरे, धोकादायक जलचर आदी बाबींचा स्पष्ट उल्लेख करावा. जेणेकरून पर्यटक अतिउत्साह न दाखविता सुरक्षितपणे पर्यटनाचा आस्वाद घेतील. पर्यटनवाढीबरोबर येथील असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने यासाठी फलकांसह मार्गदर्शक, सुरक्षारक्षक आणि गावासाठी आणि गावासाठी आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येणे शक्य आहे.


मगरी, देवमासे यांचा वावर
तेरेखोल नदीपात्रात मोठमोठ्या देवमाशांसह आठ-दहा फू ट लांबीच्या धोकादायक मगरींचाही वावर आहे. मगरींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पर्यटकांसह स्थानिकांनासाठीही हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे अशा प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी आंघोळ अथवा कपडे धुण्यासाठी उतरू नये, असे मार्गदर्शक फलक येथे लावणे अत्यंत गरजेचे आहे.

Web Title: Terekhol river becomes the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.