राष्ट्रीय परिषदेचा देवरुखात समारोप
By admin | Published: December 11, 2014 09:33 PM2014-12-11T21:33:07+5:302014-12-11T23:54:51+5:30
बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राणी यांच्या सहसंबंधाची जैवविविधता संवर्धनातील भूमिका याविषयी विचार सादर
देवरूख : शहरातील आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयात ‘नैसर्गिक साधन संपत्ती व जैवविविधता यांच्या चिरंतन विकासाकरिता संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन बेंगलोर येथील शास्त्रज्ञ डॉ. आर. आर. राव यांच्याहस्ते झाले. तीन दिवसीय परिषदेमध्ये डॉ. पी. जी. दिवाकर यांनी अंदमानातील जाखा आदिवासी यांच्याकडून नैसर्गिक साधनांचा केला जाणारा वापर याबाबत मार्गदर्शन केले. जयंत सरनाईक यांनी ‘लोकसहभागातून देवरार्इंचे संवर्धन’ याविषयी व्याख्यान दिले. मध्यप्रदेश येथील डॉ. सुशांत पुणेकर यांनी ‘जैव सागरी विविधता तसेच पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास’ याबाबत माहिती दिली. बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राणी यांच्या सहसंबंधाची जैवविविधता संवर्धनातील भूमिका याविषयी विचार सादर केले.
कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्र्रेकर यांनी माती व पाणी यांचे कोकणाच्या शाश्वत विकासकरिता संवर्धन याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
पुणे येथील डॉ. टी. सी. तारानाथ यांची जैवसंसाधने आणि त्यांचे व्यवस्थापन, डॉ. एस्. एस्. कांबळे यांनी चिरंतन व आधुनिक शेतीकरिता कीडव्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी परिपूर्ण माहिती दिली. डॉ. पी. तेताली यांनी नष्ट होऊ घातलेल्या सजिवांच्या संवर्धनासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर, डॉ. एस. आर. यादव यांनी पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पतींचा शाश्वत विकासासाठी वापर तसेच डॉ. पी. एस. इंगोले यांनी सागरी जैवविविधता या विषयावर सविस्तर माहिती
दिली.
तीन दिवसीय परिषदेमध्ये १६ राज्यातून १४० संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी संशोधन पेपर सादर केले. समारोप कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद भागवत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रताप नाइकवाडे, डॉ. मीरा काळे, सागर संकपाळ, उदय भाटे, डॉ. अमित वराळे, डॉ. हेमंत चव्हाण, संजय टाकळकर, माधुरी जोशी, धनंजय दळवी, अमृता शिंदे, अजिंक्य नाफडे यांनी मेहनत घेतली.(प्रतिनिधी)