ठाकरेंची मदत दुसऱ्याच्या खिशात हात घालून, निलेश राणेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 06:02 PM2019-08-21T18:02:14+5:302019-08-21T18:03:48+5:30

सावंतवाडी : आदित्य ठाकरे हा बोगस माणूस आहे. ठाकरे कुटुंबियांनी कधीही स्वत:च्या खिशात हात घातलेला नाही. ते नेहमी दुसऱ्याच्या ...

Thackeray's help, putting his hand in the pocket of another, criticized Nilesh Rane | ठाकरेंची मदत दुसऱ्याच्या खिशात हात घालून, निलेश राणेंची टीका

ठाकरेंची मदत दुसऱ्याच्या खिशात हात घालून, निलेश राणेंची टीका

Next
ठळक मुद्देठाकरेंची मदत दुसऱ्याच्या खिशात हात घालून, निलेश राणेंची टीका आदित्यांचे जमिनीवर बसणे दिखावा

सावंतवाडी : आदित्य ठाकरे हा बोगस माणूस आहे. ठाकरे कुटुंबियांनी कधीही स्वत:च्या खिशात हात घातलेला नाही. ते नेहमी दुसऱ्याच्या खिशात हात घालतात. जमिनीवर बसल्याने समस्या सुटत नाही, करून घेण्याची धमक पाहिजे, पूरपरिस्थिती उलटून पंधरा दिवस झाल्यानंतर ठाकरे यांचा दौरा म्हणजे दिखावा आहे. मंत्री, खासदार यांनी या दिखावामध्ये पूरग्रस्तांना काय दिले? असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

सावंतवाडी येथे संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष संजू परब यांना शुभेच्छाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत, रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, राजू बेग, गुरुनाथ पेडणेकर, गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी संजू परब यांना शुभेच्छा देत परब हे आपल्या कुटुंबातील एक सदस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे गेली चार वर्ष कोणताही विकास करू शकले नसले पालकमंत्री आपल्या विरोधकांना भेटून सहानुभूती मिळवत आहेत. असा आरोप निलेश राणे यानी केला. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर शायनिंग करतात. त्याला नेता नव्हे तर दिखावा म्हणावे.

ते म्हणाले, केवळ दौरा करणे हे सत्ताधारी पक्षाचे काम नाही. आदीत्य ठाकरे मांडी घालून खाली बसले म्हणजे मदत दिली असे होत नाही. अशा शब्दात दौऱ्याची त्यांनी खिल्ली उडवली. आदित्य ठाकरे यांना ग्रामपंचायत काय असते ते तरी माहित आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Thackeray's help, putting his hand in the pocket of another, criticized Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.