..म्हणूनच नितेश राणेंचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष, सुशांत नाईकांचा आरोप

By सुधीर राणे | Published: July 3, 2023 04:54 PM2023-07-03T16:54:14+5:302023-07-03T17:15:27+5:30

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनाथ  धर्माधिकारी यांच्यावर राग काढणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आधी स्वतःच्या मंत्रिपदाच्या ...

That why MLA Nitesh Rane is ignoring the problems of Kankavali Upzila Hospital, Sushant Naik alleges | ..म्हणूनच नितेश राणेंचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष, सुशांत नाईकांचा आरोप

..म्हणूनच नितेश राणेंचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष, सुशांत नाईकांचा आरोप

googlenewsNext

कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनाथ  धर्माधिकारी यांच्यावर राग काढणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आधी स्वतःच्या मंत्रिपदाच्या मागे फिरण्यापेक्षा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक असणारी साधनसामुग्री आणि रिक्त असलेली डॉक्टरची पदे भरावीत. स्वतःच्या रुग्णालयामध्ये रुग्ण यावेत म्हणूनच राणे उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे. 

रुग्णसेवेत नेमक्या कोणत्या समस्या आहेत याची माहिती शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाने सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांची भेट घेऊन सोमवारी घेतली. यावेळी माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर, योगेश मुंज, सचिन आचरेकर, वैभव मालंडकर, तेजस राणे, सोहम वाळके, नितेश भोगले आदी उपस्थित होते.

नाईक यांनी डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर येथेच पूर्ण उपचार व्हायला हवेत. गरज नसताना रुग्ण रेफर करू नकात अशी सूचना करतानाच हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी आवश्यक साधनांच्या कमतरतेबद्दल माहिती घेतली. यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना श्वसनाचा त्रास झाल्यास लागणारा निओनेटल व्हेंटिलेटर, वर्कस्टेशन ऍनस्थेशिया मशीन, हाडांच्या ऑपरेशनसाठी आवश्यक सीआर्म मशीन, एक्सरे लेझर प्रिंटर, लेप्रास्कोप मॉनिटरसह, ऑर्थोपेडीक ऑपरेशन साठी लागणारी सर्व इन्स्ट्रुमेंट आदी साधनसामुग्री नसल्याचे सांगितले.

तसेच कायमस्वरूपी मंजूर असलेल्या १७ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी केवळ ३ पदे भरलेली असून स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ञ, फिजिशियन ही तातडीची आणि अत्यावश्यक पदे रिक्त आहेत. सध्या कंत्राटी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात असून त्यांच्याद्वारे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचेही सांगितले. 

यावेळी सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून रिक्त पदे आणि अत्यावश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. तसेच माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी शहरातील खासगी डॉक्टर आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची मिलीभगतच्या चर्चा सुरू असल्याचे सांगत हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला. 

Web Title: That why MLA Nitesh Rane is ignoring the problems of Kankavali Upzila Hospital, Sushant Naik alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.