२४ हजारांचे दिलेले बिल आले ६३० रूपयांवर, सिंधुदुर्ग वीज वितरण कार्यालयाची पोलखोल

By अनंत खं.जाधव | Published: October 4, 2023 01:23 PM2023-10-04T13:23:20+5:302023-10-04T13:24:35+5:30

कलंबिस्त मधील शेतकऱ्याला मनस्ताप

The bill paid for 24 thousand came to 630 rupees, Polkhol of Sindhudurg electricity distribution office | २४ हजारांचे दिलेले बिल आले ६३० रूपयांवर, सिंधुदुर्ग वीज वितरण कार्यालयाची पोलखोल

२४ हजारांचे दिलेले बिल आले ६३० रूपयांवर, सिंधुदुर्ग वीज वितरण कार्यालयाची पोलखोल

googlenewsNext

सावंतवाडी : कलंबिस्त येथील शेतकऱ्याला वीज वितरण कपंनीच्या भोंगळ कारभाराचा नाहक मनस्ताप सहन लागला मिटरमध्ये बिघाड झाल्याने महिन्याला तब्बल २४ हजारांचे बिल येत असल्याने शेतकरी चांगलाच चक्रावून गेले अखेर त्याने वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून वीज वितरण कंपनी कडे दाद मागितली असता हे बिल 24 हजार वरून सध्या 630 रूपये एवढे येत आहे.

दरम्यान ग्राहकांचा मीटर योग्य असल्याचे तांत्रिक प्रमाणपत्र रत्नागिरी येथील विद्युत विभागाने फोल ठरवत मीटरमध्ये बिघाड झाल्याचे मान्य केले असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वीज ग्राहक संघटनेने पाठिंबा दिल्याने सिंधुदुर्ग वीज वितरणचा पोलखोल झाला आहे.

कलंबिस्त येथील नारायण लाडू पास्ते या शेतकर्‍याला जुलै महिन्याचे विज बिल तब्बल २४ हजार ६२० इतके आले होते. तर ऑगस्ट महिन्यात ७ हजार ५३४ रुपये एवढे बिल आले होते. अचानक ऐवढे बिल आल्याने शेतकरी चांगलाच चक्रावून गेला होता.मोठी रक्कम असल्याने पास्ते कुटुंब हवालदिल झाले होते.यावेळी त्यांनी बिलाची विचारणा करण्यासाठी विज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेत त्याना वस्तुस्थिती पटवून दिली त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी तुमचा मिटर तपासून घ्या, अशा सुचना शेतकऱ्याला केल्या.

त्यानंतर त्यांनी कुडाळ येथे मीटर तपासणी केली असता तो मीटर योग्य आहे. त्यामुळे आकारण्यात आलेली रक्कम भरा, असे शेतकरी पास्ते यांना सांगण्यात आले.त्यामुळे शेतकरी आणखी घाबरला हा प्रकार धक्कादायक होता त्यामुळे शेतकऱ्याने वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क केला. 

यावेळी ग्रामीण भागात आणि एकाच कुटुंबात महिन्याकाठी इतके बील येणे शक्य नाही. याचा संशय आल्याने संघटनेच्या‌ पदाधिकार्‍यांनी त्या मीटरची रत्नागिरी विज वितरण च्या तांत्रिक कार्यालयाकडून तपासणी करण्याची मागणी केली. त्यानंतर मीटर रत्नागिरी येथील कार्यालयात पाठविण्यात आला.त्यावेळी मीटर मध्ये काहि तरी तांत्रिक बिघाड असल्याचे पुढे आले आणि मग विज वितरण ने  ग्राहकाला कोणतेही पत्र न पाठवता बिलाची रक्कम कमी केली आहे. 

जुलै ऑगस्ट मध्ये हजारांच्या पट्टीत आलेले बिल मीटर दुरूस्ती नंतर अवघे 630 एवढे आले तसेच बिल ऑनलाईन भरण्याची सुचना ही विज वितरण कडून ग्राहकाला करण्यात आली यातून एकाच कार्यालयाचे दोन जिल्ह्यात वेगवेगळे नियम कसे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांनी ही विज वितरण च्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: The bill paid for 24 thousand came to 630 rupees, Polkhol of Sindhudurg electricity distribution office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.