‘श्यामची आई’ आता चिनी भाषेत, तळेरेतील रसिका पावसकरांनी केला अनुवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 06:24 PM2023-01-27T18:24:06+5:302023-01-27T18:24:27+5:30

पुन्हा एकदा तळेरे गाव आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचले

The book Shyam Chi Aai has now been translated into Chinese, Translated by Rasika Pavaskar from Talere | ‘श्यामची आई’ आता चिनी भाषेत, तळेरेतील रसिका पावसकरांनी केला अनुवाद

‘श्यामची आई’ आता चिनी भाषेत, तळेरेतील रसिका पावसकरांनी केला अनुवाद

googlenewsNext

निकेत पावसकर

तळेरे : भारतीय तरुणाईच्या मनात आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण करणारे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आता चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले आहे. ‘’अनाम प्रेम’’ तर्फे रविवारी (२९ जानेवारी २०२३) अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मूळच्या तळेरे येथील असलेल्या रसिका प्रभाकर पावसकर यांनी या पुस्तकाचे अनुवादन केले आहे.

रसिका प्रभाकर पावसकर या चीनच्या हनान प्रोविन्समधील “चंगचौ”  (zhengzhou) युनिव्हर्सिटीत चिनी भाषा शिकवण्याची पदवीशिक्षण घेत आहेत. एका व्रतस्थ व्यक्तीकडून झालेल्या मार्गदर्शनानुसार एका आईचे, पूज्य सानेगुरुजींचे व समाजाचे ऋण म्हणून रसिका पावसकर यांच्याकडून “श्यामची आई” चिनी अनुवादित करण्यात येत आहे.

हृदयस्थ व सत्य भावनेने भारलेली पुस्तके हृदयाला भिडतात, याची अनुभूती देणारी मराठीमध्ये अनेक पुस्तके आहेत. आई व मातृत्व यावरसुद्धा अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. अशा हृदयस्थ पुस्तकांमधे “श्यामची आई” चे स्थान गेली नऊ दशके अग्रगण्य आहे. “श्यामची आई”चे विविध भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. परंतु, चिनी भाषेत आतापर्यंत अनुवाद झाला नव्हता. त्यामुळे अनाम प्रेम परिवारातील रसिका प्रभाकर पावसकर हिने “श्यामची आई” या मराठी साहित्यातील पवित्र महन्मंगल पुस्तकाचा चायनीज भाषेमध्ये अनुवाद केला आहे.

मुंबईमध्ये २९ ला प्रकाशन

चिनी भाषेत अनुवादित ‘श्यामची आई’चे प्रकाशन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, तिसरा मजला येथे रविवारी, २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी मानद सचिव प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर, चायनीज युपेपे, जेन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तळेरे गावाला समृद्ध वारसा

तळेरे गावाला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य असा समृद्ध वारसा आहे. हा वारसा आता रसिकांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचला आहे. त्यांच्यामुळे पुन्हा एकदा तळेरे गाव आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचले आहे. रसिका यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयातील कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे आणि  चीनमध्ये हनान प्रोव्हिन्स चंगचौ (Zhengzhou) विद्यापीठामध्ये चायनीज भाषेमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहेत.

Web Title: The book Shyam Chi Aai has now been translated into Chinese, Translated by Rasika Pavaskar from Talere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.