बंदुकीतील छरा झाडावर आदळून तरूणाच्या पाठीत घुसला, माकडांना मारताना घडली घटना

By अनंत खं.जाधव | Published: November 13, 2023 07:00 PM2023-11-13T19:00:15+5:302023-11-13T19:07:11+5:30

सावंतवाडी : तळवडे येथे एअरगणीतून माकडांना मारताना उडालेला छरा झाडाला आदळून एकाच्या पाठीत घुसल्याने मोहन भिवा मालवणकर (वय-52) हे ...

The bullet from the gun hit the tree and entered the back of the young man, the incident happened while killing the monkeys | बंदुकीतील छरा झाडावर आदळून तरूणाच्या पाठीत घुसला, माकडांना मारताना घडली घटना

बंदुकीतील छरा झाडावर आदळून तरूणाच्या पाठीत घुसला, माकडांना मारताना घडली घटना

सावंतवाडी : तळवडे येथे एअरगणीतून माकडांना मारताना उडालेला छरा झाडाला आदळून एकाच्या पाठीत घुसल्याने मोहन भिवा मालवणकर (वय-52) हे गंभीर जखमी झाले. जखमी मालवणकर यांना कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर  गोव्याला हलविण्यात आले. याप्रकरणी अंकुश सिताराम लोके (24) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी तळवडे म्हाळईवाडी परिसरात घडली.

मोहन मालवणकर हे घराकडे पायी चालत येत असताना अचानक त्यांच्या पाठीत काहीतरी आदळले. यावेळी ते मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांसह कुटुंबातील व्यक्ती धावत गेले. यावेळी अंकुश लोकेंनी मालवणकर यांना घरी घेऊन जात उजेडात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या पाठीत बंदुकीतील छेरा लागल्याचे दिसून आले. माकडांना हाकण्यासाठी मारलेला छरा झाडावर आदळून तुम्हाला लागला असावा असे लोके यांनी सांगितले. त्यांना फारसा त्रास होत नसल्याने घरीच उपचार करुन ते झोपले. मात्र सोमवारी सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी उपचाराकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. 

छेरा पाठीतच असल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता गोवा येथे हलविण्यात आले. दरम्यान मुलगा महेश मालवणकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अंकुश लोके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The bullet from the gun hit the tree and entered the back of the young man, the incident happened while killing the monkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.