तळकोकणातील गडनदी, जानवली नद्यांचा संगम; ड्रोन कॅमेऱ्यातील नयनरम्य दृश्य
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 21, 2023 06:27 PM2023-07-21T18:27:00+5:302023-07-21T18:29:03+5:30
जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत
कोकणात पावसात निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. हिरवीगार झाडी, मोठ-मोठे डोंगर, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि शांत समुद्र. हे वातावरण अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात येतात. नदीचं विस्तारलेलं रूप आणि हिरवाईने नटलेलं तळकोकणाचं विहंगम दृश्य नजरेला भुरळ घालणारं असत.
कणकवली शहर दोन नद्यांच्यामध्ये वसलेलं शहर असून कणकवलीमधील गडनदी आणि जानवली नदीचा संगम वरवडे गावात होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांचा संगम अतिशय नयनरम्य आहे. याच ठिकाणची ही नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपली आहेत.