कणकवली-निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह असलदेतील रिक्षाचालकाचा

By सुधीर राणे | Published: February 24, 2024 04:09 PM2024-02-24T16:09:27+5:302024-02-24T16:10:04+5:30

कणकवली: कणकवली निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह ...

The dead body of a rickshaw puller from Asalad was found on the railway track at Kankavali Nimewadi | कणकवली-निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह असलदेतील रिक्षाचालकाचा

कणकवली-निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह असलदेतील रिक्षाचालकाचा

कणकवली: कणकवली निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह रिक्षाचालक अजय उर्फ तातोबा गणपत घाडी (४३, रा. असलदे) यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

कणकवली पोलिस व  रेल्वे सुरक्षा बलाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर चौकशी करतानाच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना दिसला होता. त्याची रिक्षा रेल्वे स्थानक वाहनतळावर पार्क केली होती. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून माहिती दिली. त्यांनी कणकवली येथे येऊन मृतदेह, कपडे व चप्पल पाहिल्यानंतर त्याला ओळखले. त्यामुळे तो मृतदेह रिक्षाचालक अजय उर्फ तातोबा गणपत घाडी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तातोबा घाडी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, असलदे येथील अजय  घाडी हे  शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरामधून रिक्षा घेवून  नेहमीप्रमाणे नांदगाव रिक्षा स्टँड येथे गेले होते. मात्र, सायंकाळी ६ वाजले तरी ते घरी परतले नव्हते. त्यांच्या शेजारच्या आजारी असलेल्या एका मुलाला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी रिक्षा हवी असल्याने त्यांना कुटुंबीयांनी फोन लावला तर तो बंद होता.

दरम्यानच्या काळात कणकवली रेल्वे स्थानक परिसरात त्यांची रिक्षा उभी असल्याचे ग्रामस्थ व पोलिसांनी घाडी यांच्या कुटुंबियाना कळवले. त्यानंतर त्यांचे भाऊ व नातेवाईक कणकवली येथे आले. भाऊ मारुती घाडी यांना पहिल्यांदा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी  उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात नेले. त्यानंतर तातोबा घाडी याचाच तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना सांगितले.

तातोबा घाडी यांनी कणकवली रेल्वे स्थानक वाहन तळावर आपली रिक्षा उभी केली होती. त्या ठिकाणी पोलिसांना मोबाईल, रिक्षेची चावी, ओळखपत्र, रोख रक्कम आढळली आहे.  पोलिसांनी याप्रकरणी मारुती घाडी यांचे जबाब नोंदविले आहेत. तसेच सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. 

अजय घाडी हे प्रामाणिक रिक्षाचालक म्हणून परिचित होते. नांदगाव तिठा येथे ते रिक्षा व्यवसाय करीत असत. तेथील सन्मित्र रिक्षा संघटनेने शनिवारी रिक्षा बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा,मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार विनोद सुपल,चंद्रकांत झोरे करीत आहेत.

Web Title: The dead body of a rickshaw puller from Asalad was found on the railway track at Kankavali Nimewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.